News Flash

लारासाठी स्वतः डिझाईन केली अंगठी; अशी आहे लारा आणि महेश भूपतीची प्रेमकहाणी!

लाराने भारतीय टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २००३ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘अंदाज’ हा तिचा पहिला चित्रपट ठरला. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपट केले. लारा आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. लाराचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ तिच्या प्रेमकहाणीविषयी!

लाराच्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या मात्र तिने महेश भूपतीशी लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी लाराचं नाव केली दोरजी या भूटानी अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. हे दोघे ९ वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. केलीनंतर लाराच्या आयुष्यात अभिनेता डिनो मोरिया याने प्रवेश केला. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती. पण काही काळानंतरच या दोघांचं ब्रेकअप झालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

आणि त्यानंतर लाराची ओळख भारतीय टेनिसपटू महेश भूपतीशी झाली. महेशचं त्यावेळी लग्न झालं होतं. मात्र ते लग्न फार काळ टिकलं नाही. श्वेता जयशंकर ही महेशची पहिली पत्नी. या दोघांचा २००९ साली घटस्फोट झाला. या नंतर लारा आणि महेश भेटू लागले. अमेरिकेत एका कँडल लाईट डिनरदरम्यान महेशने लाराला प्रपोझ केलं. अशी चर्चा आहे की, महेशने त्यावेळी लाराला जी अंगठी घातली होती, ती त्याने स्वतः डिझाईन केली होती. या काळात महेश युएस ओपन स्पर्धांसाठी न्यूयॉर्कमध्ये होता.

या दोघांनीही आपलं नातं काही काळ लपवून ठेवलं होतं. पण २०११मध्ये त्यांनी आपले काही मित्र आणि परिवारातल्या सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांना आत्ता एक मुलगीही आहे. लाराने लग्नानंतर आपलं काम सोडून पूर्णपणे परिवाराकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:32 pm

Web Title: here is the lovestory of lara dutta and mahesh bhupathi vsk 98
Next Stories
1 लाडक्या लेकासोबत हार्दिक पांड्याचे खास क्षण; अनुष्का शर्माने केली कमेंट
2 रणवीर सिंग ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत कऱणार काम; साईन केला बिग बजेट चित्रपट
3 पार्कमध्ये सुरु होते अभिषेकच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग, पोलिस आले अन्…
Just Now!
X