बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची चाहत्यांच्या मनातील त्यांची जागा कायम आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी श्रीदेवी यांचा बार्थटपमध्ये बुडून मृत्यू झाला. पण श्रीदेवी यांच्यावर जीवनावर आधारित पुस्तक ‘श्रीदेवी : द इटर्नल स्क्रीन गॉडेस’ या पुस्तकात श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हे पुस्तक लेखक सत्यार्थ नायक यांनी लिहिले आहे.

नुकताच ‘श्रीदेवी : द इटर्नल स्क्रीन गॉडेस’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये सत्यार्थ यांनी श्रीदेवी यांना कमी रक्त दाबाचा त्रास असल्याचे म्हटले आहे. तसेच पुस्तकामध्ये त्यांनी श्रीदेवी यांच्या जवळच्या व्यक्तींशी साधलेल्या संवादा विषयी देखील माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

No greater feeling than a dream coming true. #sridevibooklaunch @penguinindia

A post shared by Satyarth Nayak (@satyarthnayak) on

सत्यार्थ यांनी ‘बिझनेस टाइम्स’शी देखील संवाद साधला आहे. दरम्यान त्यांनी ‘मी पंकज पाराशर (ज्यांनी चालबाज चित्रपटात श्रीदेवी यांच्यासोबत काम केले आहे आणि दाक्षिणात्य सुपरस्टार) नागार्जुनला भेटलो. श्रीदेवी यांना कमी रक्त दाबाचा त्रास असल्याचे मला याच दोघांनी सांगितले. या दोघांसोबत काम करताना श्रीदेवी बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. त्यानंतर मी श्रीदेवी यांची भाची माहेश्वरी यांची भेट घेतली. त्यांनी मला श्रीदेवी या बाथरुमध्ये लादीवर पडल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यातून रक्त येत होते असे सांगितले. तसेच मी बोनी सरांशीदेखील संवाद साधला. त्यांनी मला कमी रक्तदाबाच्या त्रासाने एकदा अचनाक चालता चालता श्रीदेवी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्याचे सांगितले’ असे सत्यार्थ यांनी म्हटले.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर काही दिवसांमध्येच केरळचे पोलीस महासंचालक यांनी प्रश्न उभा केला होता. ‘श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून त्यांची हत्या करण्यात आली होती’ असा अरोप त्यांनी केला होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई मधील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.