एकीकडे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमी कपूर चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता आहे. रिद्धिमा ही एक बिझनेसवुमन आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिद्धिमाने चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिद्धिमाने ती एक उत्तम शेफ असल्याचे सांगितले आहे. लॉकडाउनमुळे मिळालेला वेळ ती जेवण बनवण्यात घालवत होती. रिद्धिमा एक फॅनशन डिझायनर होती. त्यानंतर ती ज्वेलरी डिझायनर बनली. लोकांना जेव्हा तिने डिझाइन केलेली ज्वेलरी आवडली तेव्हा तिला काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि रिद्धिमा आणखी आनंदाने काम करु लागली.

आणखी वाचा : २९ दिवस रुग्णालयात असणाऱ्या अनिरुद्ध दवेची पत्नीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाला…

‘मी एक फॅशन डिझायनर होते. नंतर मी ज्वेलरी डिझाइन करण्यास सुरुवात केली. २०१५मध्ये माझा बिझनेस चांगला सुरु होता. जर मी हे केले नसते तर एक योग प्रशिक्षक झाले असते’ असे रिद्धिमा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा मी लंडनमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण मी कधी फार विचार केला नाही आणि लक्ष ही दिले नाही. मात्र, संपूर्ण कुटुंबीयांसोबत या विषयावर चर्चा केली होती. लंडनहून भारतात परत आले तेव्हा माझे लग्न झाले. पण आई जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा नेहमी सांगायची की मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. पण मी त्या नाकारल्या. त्यावेळी मी १६ ते १७ वर्षांची होते. मी शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले होते.’