20 October 2020

News Flash

आर्ची म्हणते, “नाइट लाइफ म्हणजे काय रे भाऊ?”

उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का

रिंकू राजगुरू

मुंबईत २७ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मरीन ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीत नाइट लाइफ सुरू करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. तर काहींनी समर्थनही केलं. नाइट लाइफबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला तिचं मत विचारला असता, तिच्याकडून अजबच प्रतिक्रिया आली. नाइट लाइफबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच रिंकूने विचारलं, “नाइट लाइफ म्हणजे काय रे भाऊ?”

‘सैराट’ चित्रपट फेम आर्ची अर्थात रिंकू सध्या तिच्या ‘मेकअप’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्य व्यग्र आहे. यानिमित्तच तिने पुण्यात एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला नाइट लाइफविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आपल्याला नाइट लाइफ म्हणजे काय हेच ठाऊक नसल्याचं रिंकूनं म्हटलं. त्यामुळे तिचं हे उत्तर ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नाइट लाइफ म्हणजे काय हे मला माहित नाही, त्यामुळे त्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही, असं रिंकू यावेळी म्हणाली.

‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहोचलं. पदार्पणातच रिंकूला मोठं यश मिळालं. त्यानंतर ती ‘कागर’ या चित्रपटात झळकली. आता तिचा ‘मेकअप’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रिंकूने पहिल्यांदाच शहरातील एका तरुणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत चिन्मय उदगीरकर मुख्य भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 5:33 pm

Web Title: here is what rinku rajguru said on night life in mumbai ssv 92
Next Stories
1 ‘तू देश सोडून जा’ असा सल्ला देणाऱ्या महिलेला जावेद जाफरीचे भन्नाट उत्तर, म्हणाला…
2 तान्हाजींच्या वंशजांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
3 ‘या’ दिवसांमध्ये रंगणार ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’
Just Now!
X