News Flash

लग्न म्हणजे मरणसंस्था- सलमान खान

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान लग्न कधी करणार हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे.

सलमान खान

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान लग्न कधी करणार हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं. ईदच्या मुहूर्तावर तो ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सलमान मुलाखती देण्यात व्यग्र आहे. ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं.

‘लग्नावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे मरणसंस्था आहे. मैत्रीबद्दल विचारत असाल तर हो, मला मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे,’ असं उत्तर सलमानने दिलं. यावेळी त्याला सरोगसीच्या माध्यमातून पिता होण्याबाबतही प्रश्न विचारला गेला. त्यावर, ते जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल असं तो म्हणाला.

वाचा : अनोळखी व्यक्तीचा मेसेज चुकून वाचला अन् सुरू झाली सुष्मिताची प्रेमकहाणी

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी सलमान म्हणाला होता की, ‘आजच्या जमान्यात लग्न ही आयुष्यभर टिकणारी गोष्ट राहिलेली नाही. हल्ली असे काही घडतच नाही.’ ‘भारत’ या चित्रपटात सलमानसोबत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफलाही ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तो लग्न कधी करणार याचं उत्तर फक्त देवाकडे आणि सलमानकडे आहे,’ असं ती गमतीशीरपणे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 1:58 pm

Web Title: here is what salman khan think about marriage
Next Stories
1 Video: मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’ला पाहिलत का?
2 वयाच्या ४५व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवणारी मलायका फॉलो करते ‘हा’ डाएट प्लान
3 रणबीर-आलियाचे वाराणसीतील हे फोटो पाहिलेत का?
Just Now!
X