13 December 2018

News Flash

Oscars 2018: ‘ऑस्कर’च्या लाखोंच्या गुडी बॅगमध्ये असते तरी काय?

श्रीमंत लोकांनाच अनेक गोष्टी फुकट का मिळतात असा प्रश्न अनेकांना पडतो

श्रीमंत लोकांनाच अनेक गोष्टी फुकट का मिळतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्यातही जर तुम्ही ऑस्कर सोहळ्याचे वेडे असाल तर तुम्हाला या गोष्टीचेही आश्चर्य वाटत असेल की ऑस्करमध्ये नामांकन आणि त्यानंतर मानांकन मिळालेल्यांना हजारो डॉलर्सचे गुडी बॅगही मिळतात. ऑस्कर कोणी जिंकला आणि त्या दिवशी कोणी काय घातले याकडे जसे प्रेक्षकांचे लक्ष असते तसेच प्रत्येक वर्षी गुडी बॅगची वाढत जाणारी किंमतही अनेकांचे लक्ष वेधते. चला तर यावर्षी ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्यांना गुडी बॅगमधून नक्की काय काय मिळालं ते पाहूया…
०१. टांझानियामध्ये १२ दिवसांचे वेकेशन
ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्यांच्या गुडी बॅगमधील सर्वात महागडे गिफ्ट हे असते. सुमारे ४० हजारांहून जास्त किंमतीचे हे गिफ्ट असते. या व्हेकेशनमझ्ये स्पा, खाजगी सफारी गाइड, वाइल्ड गेम ड्राइव्ह आणि शॅम्पेन आणि ब्रेकफास्टसह हॉट एअर बलून सफारीचाही समावेश असतो.

०२. एका आठवड्याचा गोल्डन डोअर स्पा
या गोल्डन डोअर स्पाची साधारण किंमत ८,८५० डॉलर असते. सॅन डिएनगो स्पा त्यांच्या एकूण मिळकतीतील १०० टक्के हे मुलांच्या संस्थांना दान करतात.

०३. ‘२३ अॅण्ड मी’चा डीएनए कीट
१९९ डॉलर किंमतीचे वेगवेगळे आरोग्य, गुण आणि वंश यांच्याशी निगडीत ७५ डीएनए रिपोर्ट करुन देतात.

०४. काऊईमधील पोईपीय येथील कोलोआ लैंडिंग रिसॉर्टमध्ये ६ रात्री आणि ७ दिवसांचे रहाणे
नामांकन मिळालेल्यांना आणि त्यांच्या पाहुण्यांना सी-व्ह्यू असलेला दोन बेडरुमचा व्हिला रहायला मिळतो. याशिवाय येथे हेलिकॉप्टर टूर आणि झिपलाइनसारखे अॅडव्हेंचर खेळही खेळू शकतात.

०५. पाळीव प्राण्यांसाठी १० हजार बाऊल खाद्याचे दान
नामांकन मिळालेल्या कलाकारांच्या नावावरुन हे दान केले जाते. कलाकारांना त्यांच्या आवडत्या प्राण्यांच्या एनजीओला हे दान करण्याची मूभा असते. यासाठी त्यांना ८ हजार डॉलर्स दिले जातात. यात त्यांच्या खासगी कुत्रे आणि मांजरांसाठीही खास गिफ्ट असतात.

०६. पेपरफेसकडून ‘स्टायलिश’ पेपर स्प्रे
पेपरफेस कंपनीला त्यांचे ग्राहक हटके स्टाइलमध्ये सुरक्षित रहावे असे वाटते. म्हणून २७ डॉलरला मिळणाऱ्या पेपर स्प्रेला खास सेलिब्रिटींसाठी स्टायलिश पद्धतीने डिझाइन केले जाते. या पेपर स्प्रेची किंमत १२५ डॉलर आहे.

०७. वर्षभराचे हिलिंग सेंट प्रोडक्ट
उत्तम त्वचेसाठी तसेच केसांच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असे वर्षभर पुरतील असे प्रोडक्ट ‘बिझनेस इनसायडर’कडून देण्यात येतात. या प्रोडक्टची किंमत २,३१६ डॉलर्स एवढी असते.

०८. पेटाकडून बाथ बॉम्ब
पेटाकडून खास हे बाथ बॉम्ब विजेत्या आणि नामांकन मिळालेल्या कलाकारांना दिले जातात. पेटा नेहमीच शाकाहारी असण्याला प्राधान्य देते. त्यांचे हे बाथ बॉम्बही नैसर्गिक तत्त्वांनी बनवण्यात आलेले असतात.

०९. मॉर्डन इनोवेशनकडून लेव्हीटिंग ब्ल्यूटूथ स्पिकर
१९५ डॉलरला मिळणारे लेव्हीटिंग ब्ल्यूटूथ स्पिकर कलाकारांना गिफ्ट म्हणून दिले जातात. ज्यांना अत्याधुनिक स्पिकरची आवड असते त्यांना या स्पिकरचे महत्त्व नक्कीच कळेल. स्पिकर वेड्यांना हे स्पिकर आपल्याकडेही असावे असे नक्कीच वाटते. ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेल्या प्रत्येक कलाकाराला हे स्पिकर गुडी बॅगमध्ये मिळतात.

१०. ले सेलीनचे लक्झरी फॉल्स लॅशेस
नामांकन मिळालेल्यांना ले सेलीनचे २३ प्रोडक्ट गुडी बॅगमध्ये गीफ्ट म्हणून मिळतात. त्यांचा बेस्ट सेलर बॉक्स हा ३३० डॉलरचा आहे.

First Published on March 5, 2018 4:11 pm

Web Title: here is whats inside oscars 2018 gift bag