News Flash

#BadhaaiHo : आयुषमान खुरानावर बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

मोठमोठे बॉलिवूड कलाकार या शुभेच्छा अभिनेता आयुषमान खुरानाला टॅग करून देत आहेत.

आयुषमान खुराना

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर ‘बधाई हो’ #BadhaaiHo हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. विशेष म्हणजे मोठमोठे बॉलिवूड कलाकार या शुभेच्छा अभिनेता आयुषमान खुरानाला टॅग करून देत आहेत. स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर, सुनिधी चौहान आणि आता करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींनी आयुषमान शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण या शुभेच्छा देण्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

‘दंगल गर्ल’ अर्थात अभिनेत्री सान्या मल्होत्राने सर्वांत आधी हा हॅशटॅग वापरला. त्यासोबतच येत्या काही दिवसांत आयुषमान तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार आहे, असंदेखील तिनं या ट्विटमध्ये लिहिलं. इतकंच नव्हे तर सर्वांना त्याला शुभेच्छा देण्यासाठी विनंतीदेखील केली. सान्याच्या या ट्विटने सर्वांनाच पेचात पाडलं. याबद्दल आयुषमान काही सांगेल म्हणून सेलिब्रिटींनी त्याला ‘बधाई हो’ #BadhaaiHo म्हणायला सुरुवात केली. बघता बघता हा हॅशटॅग सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होऊ लागला आणि आयुषमान नेमकी कोणती बातमी सांगणार आहे याची उत्सुकता अधिकच वाढली. खरंतर सर्वांकडून मिळणाऱ्या या शुभेच्छांना पाहून आयुषमान सुद्धा वैतागला आहे.

आयुषमान आणि सान्या आगामी ‘बधाई हो’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. कदाचित म्हणूनच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सान्याने हा अनोखा फंडा वापरला असावा. अमित शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या शुभेच्छांमागचं नेमकं कारण कदाचित चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच सर्वांना समजणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 11:33 am

Web Title: here is why bollywood is wishing ayushmann khurrana and sanya malhotra badhaai ho
Next Stories
1 #AshaBhosle : नजाकतीच्या सुरांची स्वर’आशा’..
2 प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला बिग बींचा मदतीचा हात
3 चित्र रंजन : भानावर आणणारी गोष्ट
Just Now!
X