07 March 2021

News Flash

.. म्हणून शाहीद वाढवतोय दाढी

चित्रपटातील भूमिकेप्रमाणे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बदल आणताना दिसत आहेत.

चित्रपटातील भूमिकेप्रमाणे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बदल आणताना दिसत आहेत. चित्रपटातील पात्राशी एकरुप झाल्यावरचं त्या भूमिकेला न्याय देता येऊ शकतो. यामुळेचं रणवीर सिंगने ‘बाजीराव मस्तानी’साठी टक्कल केलेले तर आमीरने त्याच्या आगामी ‘दंगल’ चित्रपटासाठी वजन वाढवलेयं.  गेले काही दिवस शाहीदसुद्धा ‘बिअर्ड लूक’मध्ये दिसत आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये दाढी वाढवण्याचा ट्रेण्डही चालू आहे. मात्र, शाहिदने त्याच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटासाठी दाढी वाढवल्याचे कळते. शाहीदने त्याच्या लूकमध्ये बदल करण्याची ही पहिलीचं वेळ नाही. यापूर्वी ‘कमिने’ चित्रपटाकरिता योग्य शरीरयष्टीसाठी त्याने तब्बल आठ महिने काम केले होते. तसेच, ‘हैदर’साठी त्याने टक्कल केले होते. आणि यावेळी, तो दाढी वाढवतोय.
दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात तो एका जवानाच्या भूमिकेत दिसेल. यात कंगना आणि सैफ अली खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. कंगना यात ४० च्या दशकातील अभिनेत्रीच्या तर सैफ फिल्ममेकरच्या भूमिकेत दिसतील. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’च्या चित्रीकरणास ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 11:25 am

Web Title: here is why shahid kapoor is growing his beard
टॅग : Shahid Kapoor
Next Stories
1 माझे घर ‘कल्याण’
2 ‘लतादीदी आणि रागदारी’
3 दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवासाठी ‘परतु’ची निवड
Just Now!
X