सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. ट्विटरवर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा घटस्फोट ट्रेंड होत होता. हॅशटॅग VirushkaDivorce सोबतच अनेक मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस पडला. सर्वांनाच माहित आहे विराट आणि अनुष्का त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. तरीही सोशल मीडियावर #VirushkaDivorce का ट्रेंड होत होतं जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत.

विराट आणि अनुष्कावरील एक जुने आर्टीकल व्हायरल झाले होते. यामध्ये ते दोघे विभक्त होण्याचा विचार करत असल्याचे म्हटल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हे आर्टीक विराट आणि अनुष्का एकमेकांना डेट करत असतानाच्या वेळचं असल्याचे म्हटले जाते. पण अनेकांनी ते शेअर करताना त्यावरील तारीक न पाहताच शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले. बघता बघता ट्विटर #VirushkaDivorce ट्रेंड होऊ लागला होता. तसेच मीम्समध्ये नेटकऱ्यांनी विराट आणि अनुष्का हा ट्रेंड सोशल मीडियावर पाहातील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल यावर तयार करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी देखील गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काच्या पाताल लोक या सीरिजमध्ये त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा फोटो एका गुन्हेगारासोबत वापरल्यामुळे सीरिजवर टीका केली होती. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदाराने विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली होती. त्यावेळी विराट आणि अनुष्का चर्चेत होते. त्यामुळे आता ते घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. पण या सर्व अफवा जुने आर्टीकल शेअर केल्यामुळे सुरु झाल्या असल्याचे म्हटले जाते.