News Flash

‘म्हणून सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी उत्सुक नव्हते’, शर्मिला टागोर यांनी केला खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या लग्नासाठी नेहमीच आनंदी, उत्साही असते. पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर मात्र मुलगा सैफ अली खानच्या लग्नासाठी उत्सुक नव्हत्या. त्यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न २०१२ साली झाले. ते दोघे लग्न करतायेत हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. आज दोघेही आनंदाने एकत्र राहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. पण जेव्हा सैफचे लग्न झाले तेव्हा सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर या उत्साही नव्हत्या. त्या मागचे कारण म्हणजे सैफचे वडील मंसूर अली खान पतौडी हे होते.

पाहा : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या एक वर्ष आधी मंसूर अली खान पतौडी यांचे निधन झाले होते. एका मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी सांगितले होते की त्या सैफच्या लग्नासाठी उत्साही नव्हत्या. तेव्हा त्यांना लग्नात काय परिधान करणार असे विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी हा आनंदाचा क्षण आहे मी काय परिधान केले आहे याने काही फरक पडत नव्हता. त्यामुळे मी माझ्या कलेक्शनमधील एक जूनी साडी नेसली होती असे म्हटले होते.

पुढे त्या म्हणाल्या त्यावेळी सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी मी उत्सुक दिसत नव्हते कारण माझ्या पतिच्या निधनाला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. पण कुटुंबातील इतर सदस्य उत्सुक होते.

सप्टेंबर २०११ मध्ये मंसूर अली खान पतौडी यांचे निधन झाले होते. त्यावेळी करीना कपूर देखील तेथे उपस्थित होती. ऑक्टोबर २०१२मध्ये सैफ अली खान आणि करीन कपूरचे लग्न झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 4:54 pm

Web Title: here reason why sharmila tagore was not excited about saif ali khan wedding avb 95
Next Stories
1 सलमान खानची ‘भाईजान्स किचन’ला भेट; फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच्या जेवणाचा दर्जा स्वतः तपासला!
2 जवळच्या व्यक्तीचे करोनाने निधन झाल्याने मिलिंद सोमण झाला भावूक, म्हणाला…
3 Video: “मी अजिबात ठिक नाही…”; ‘फिट अ‍ॅण्ड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं
Just Now!
X