News Flash

सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.

सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
श्रद्धा कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर साहाजिकच अनेक निर्मात्यांचा कल बायोपिककडे वाढत चालला आहे. ‘संजू’ नंतर बाळासाहेब ठाकरे, सायना नेहवाल,गुलशन कुमार यांच्याही आयुष्यावर आधारित बायोपिक येत्या काळात येणार आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटामधील श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फोटोमध्ये श्रद्धा हुबेहूब सायनाप्रमाणे दिसत असून श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

#SAINA

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये श्रद्धा बॅडमिंटन कोर्टमध्ये उभी असून तिच्या हातात बॅडमिंटनचं रॅकेट आहे. विशेष म्हणजे यात तिच्या चेहऱ्यावर खेळाडूचा करारी भाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

दरम्यान, दिग्दर्शक अमोल गुप्ते हा सायना नेहवालच्या जीवनावरील चित्रपट करणार असून या चित्रपटाची आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सायनाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी श्रद्धादेखील प्रचंड मेहनत घेत असून तिने काही दिवसांपासून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षणही घेतले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 10:47 am

Web Title: heres shraddha kapoors first look as saina nehwal
Next Stories
1 Asia Cup 2018 Final : धोनीची समयसूचकता, जडेजाचा अचूक थ्रो… मोहम्मद मिथुन बाद, पाहा Video
2 धोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज – सुनील गावसकर
3 BLOG : २०१९ विश्वचषकासाठी धोनीवर अवलंबून राहणं भारतासाठी धोक्याचं !
Just Now!
X