05 March 2021

News Flash

करणच्या जुळ्या मुलांबद्दल काजोल म्हणते..

ती कधीही परत येणार नाहीये

करण जोहर, काजोल

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या मुलांमुळे. काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या मार्गाने करणने दोन जुळ्या मुलांचे पालकत्व स्वीकारत एक नवी भूमिका हाती घेतली आहे. करणच्या या नव्या भूमिकेमध्ये सध्या तो चांगलाच रंगला असताना त्याच्या मुलांची भेट घेण्यासाठी बी-टाऊन कलाकारांनी करणच्या घरी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पण, या कलाकारांच्या गर्दीत अभिनेत्री काजोलची अनुपस्थिती मात्र अनेकांनाच पेचात पाडून गेली. तसं पाहायला गेलं तर, चित्रपटसृष्टीत करण जोहर हा अनेकांचाच खास मित्र आहे. त्यातही एक काळ असा होता की त्याची, अभिनेत्री काजोलची आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची खास मैत्री होती. पण, कालांतराने करण-काजोलच्या मैत्रीपूर्ण नात्याला तडा गेला आणि या दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली.

मैत्रीमध्ये दुरावा आला असला तरीही काजोल या आनंदाच्या प्रसंगी करणला शुभेच्छा देण्यासाठी जाईल अशी अनेकांना अपेक्षा होती. पण तसे काहीही झाले नाही. करणच्या यश-रुही या जुळ्या मुलांची भेट घेण्याविषयी विचारले असता काजोलने स्पष्ट नकार देत, ‘मला त्या एका विषयावर काहीच बोलायचे नाहीये’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे करण-काजोलच्या मैत्रीमध्ये आलेला दुरावा आजही कायम असल्याचेच चित्र सध्या पाहायला मिळतेय.

काही महिन्यांपू्र्वीच करणने त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक सर्वांच्या भेटीला आणले. या पुस्तकातून करणचे बरेच पैलू आणि त्याच्या आयुष्यातील बरेच प्रसंग सर्वांसमोर उघड झाले. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकत करणने या पुस्तकात काजोल आणि त्याच्यामध्ये झालेल्या वादावरुनही पडदा उचलला. ‘ते सर्व संपले आहे…. आणि आता ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाहीये. मलाही त्यांच्यासोबत यापुढे काम करायचे नाहीये. माझ्यालेखी तिचे महत्त्व फार होते.. पण, आता ते सर्व संपले आहे. परिस्थिती बदलली आहे. मला माझ्या आयुष्यातील कोणताच क्षण तिला द्यायचा नाहीये. कारण, गेल्या २५ वर्षात तिच्याबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना आता संपल्या आहेत.’ असे करणने त्याच्या पुस्तकात म्हटले आहे. करणने पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या त्याच्या भावना आणि काजोलचा सध्याचा पवित्रा पाहता सध्या बी-टाऊनमध्ये बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 8:28 pm

Web Title: heres what bollywood actress kajol said about visiting karan johars twins
Next Stories
1 बयोआजींच्या ‘कान’वारीमुळे राधाची सुटका?
2 Begum Jaan Making: पडद्यामागची ‘बेगम जान’
3 Video : ‘हिचकी’ चित्रपटात राणी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसण्याचे संकेत
Just Now!
X