News Flash

‘ब्रेकअप’मधून सावरण्यासाठी कतरिनाने काढला ‘हा’ तोडगा

हा तोडगा कतरिनाला कितपत फळतो हे पाहण औत्सुक्याचे ठरणार

कतरिना कैफ

चित्रपटसृष्टीमध्ये यश आणि अपयशाची समीकरणे काही वेगळीच आहेत. जी आजवर कित्येकांना उमगली नाहीत. त्यातही अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये असणारी नाती आणि नात्यांमध्ये येणारे दुरावे याबाबतची चर्चा बी टाऊनमध्ये नेहमीच रंगत असते. याच चर्चांमध्ये गेले काही दिवस अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपची चर्चाही रंगते आहे.

रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात आलेल्या दुराव्यानंतर या दोघांनीही एकमेकांना टाळणेच योग्य समजले होते. आपआपल्या कामांमध्ये हे दोन्ही कलाकार सध्या व्यग्र आहेत. पण, कतरिनाने तिच्या जीवनात घडलेल्या या प्रसंगांपासून सावरण्यासाठी एक नवा तोडगा काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चित्रपटांच्या वाट्याला येणारे अपयश आणि ब्रेकअपमधून सावरण्यासाठी कतरिनाने वास्तुशास्त्राचा आधार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना सध्या तिच्या वांद्र्यातील घराचे नुतनीकरण करुन घेत आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि गरजेचे बदल तिच्या या घरात करण्यात येणार आहेत. घरामध्ये हे बदल करण्यासाठी कतरिनाने एका वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र कतरिनाला कितपत फळतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी कॅट आणि रणबीर त्यांच्या कार्टर रोड येथील घरात राहात होते. पण काही कारणांस्तव बराच काळ चाललेल्या त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. आपल्या व्यावसायिक आणि खासगी जीवनाला पुर्ववत बनवण्यासाठी कतरिनाने हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या रणबीर आणि कतरिना अनुराग बासूच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पण, या सेलिब्रेशनमध्ये ‘कॅट’ मात्र कुठेही दिसली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 2:11 am

Web Title: heres what katrina did to be successful in her personal and professional life
Next Stories
1 नाना पाटेकर यांच्या पत्नीचे छोट्या पडद्यावर पदार्पण
2 सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानात ‘पिंक’वर बंदी
3 ‘या’ चित्रपटासाठी आलिया आणि परिणीतीमध्ये रस्सीखेच
Just Now!
X