News Flash

‘हिरोपंती-2’ च्या ‘त्या’ खास सीनचं रशियात होणार शूटिंग

सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अ‍ॅक्शन दृश्यांचं शूटिंग पार पडणार आहे.

(file photo-tiger shroff)

काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी आणण्यात आली होती. त्यामुळे अनेक सिनेमांचं शूटिंग इतर राज्यात सुरू करण्यात आलं होतं. याच काळात अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती-2’ सिनेमाचं मुंबईतील शूटिंग पूर्ण झालं होतं. मात्र पुढील शूटिंगसाठी या सिनेमाच्या टीमने दुसरं कोणतही राज्य न गाठता थेट रशिया गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

या सिनेमाच्या टीमने आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चित्रपटाचे दुसरे शुटींग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

‘हिरोपंती 2’ शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अ‍ॅक्शन दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्याची योजना बनवत असून तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून लोकेशनचा शोध घेत आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अ‍ॅक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणं सुरु आहे. ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे. जे स्कायफॉल (2012), द बॉर्न अल्टीमेटम (2007) आणि द बॉर्न सुप्रमसी (2004) साठी ओळखले जातात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

हे देखील वाचा: बलात्काराचा आरोप असलेल्या पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलीना संतापली!

निर्मात्यांनी घेतली लसीकरणाची जबाबदारी

दरम्यान रशियात जाण्यापूर्वी टीममधील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी निर्मात्यांनी घेतली आहे. संपूर्ण काळजी घेऊनच सिनेमाची टीम रशियात रवाना होणार आहे.

हिरोपंती या सिनेमातूनच टायगर श्रॉपने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. आता याच सिनेमाच्या दुसऱ्या भागात टागरची दमदार अ‍ॅक्शन चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 5:18 pm

Web Title: heropant action seen shooting will be done in rasia taiger shroff and tara sutariya will bord soon kpw 89
Next Stories
1 ३६ दिवसानंतरही अभिनेता अनिरूद्ध दवेची करोनाशी झुंज सुरूच; सेल्फी शेअर करत दिली हेल्थ अपडेट
2 अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं
3 बलात्काराचा आरोप असलेल्या पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलीना संतापली!
Just Now!
X