बॉलिवूड स्टार आणि फॅशन डिझायनर यांच्यात नेहमीच चांगली मैत्री पाहण्यात आली आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि सब्यसाची मुखर्जी हे अभिनेत्री राणी मुखर्जी यांचे फार जवळचे मित्र आहेत. हे तिघं फार जवळचे मित्र आहेत. एशियन एजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नुकतीच राणीने सब्यसाचीची भेट घेतली. यावेळी सब्यसाचीने तिला सुंदर कानातले भेट म्हणून दिले. राणीला हे कानातले एवढे आवडले की ती कानातले पाहून भावूकच आहे. राणीचा ‘हिचकी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.
या सिनेमात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित या सिनेमात एका अशा मुलीची कथा सांगण्यात आली आहे जी ‘टॉटेट सिंड्रोम’ tourette syndrome या आजाराने ग्रासित असते. यामुळे ती बोलताना सतत अडकत असते. तिच्या या बोलताना अडखळण्यामुळे कोणीही तिला शिक्षिकेची नोकरी देत नसते. शालेय व्यवस्थापकांच्यामते, मुलं राणीला पाहून शिकणार तर नाहीच उलट हसतच राहतील.
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे. सिनेमाची कथा वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची उत्सुकता आहे. पण याआधी प्रदर्शित झालेला हिंदी मीडियम हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकला नव्हता. त्यामुळे राणी मुखर्जीचा जलवा या सिनेमात दिसून येतो की नाही हे तर येणारा काळच सांगेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2018 8:25 pm