02 March 2021

News Flash

“आरोप करणाऱ्यांनी रिया चक्रवर्तीची माफी मागावी”; फरहान अख्तर संतापला

“रियाचा पाठलाग करु नका,” मुंबई पोलिसांच्या सूचना

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अखेर जामिन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर तिची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान अभिनेता फरहान अख्तर याने रियाची बाजू घेत टीकाकारांवर निशाणा साधला आहे. आता तरी तुम्ही रियाची माफी मागणार का? असा सवाल त्याने केला आहे.

अवश्य पाहा – “चाप ओढला अन् कान सुन्न झाले”; ‘मिर्झापूर २’साठी अभिनेत्रीने केली खरीखुरी ‘शुटिंग’

“रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप करणारे वृत्त निवेदक आता तरी माफी मागणार का? मला वाटत नाही ते मागतील. पण त्यांनी आता आपला विषय बदलायला हवा. तेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल.” अशा आशयाचं ट्विट करुन फरहानने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स; किंमत पाहून तुम्हाला येईल चक्कर

रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 5:02 pm

Web Title: high court grants rhea chakraborty bail farhan akhtar twitter reaction mppg 94
Next Stories
1 ‘नवरी मिळे नवऱ्याला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
2 Video : ‘शेतकरी आहेत म्हणूनच आपण आहोत’
3 अभिनेत्याच्या मुलाला करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
Just Now!
X