News Flash

बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही रजनीकांतची कमाई अधिक , वाचून बसेल धक्का

रजनीकांत यांनी ‘भाग्य देबता’ या बंगाली चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती

रजनीकांत

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाचा दर्जा प्राप्त असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांचा वावर चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये आहे. लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीमुळे प्रेक्षकांची मने जिंकलेल्या रजनीकांत यांनी ‘भाग्य देबता’ या बंगाली चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय झालेला हा कलाकार आज अनेकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर त्यांचा प्रत्येक सुपरहिट ठरतो. सहाजिकच या लोकप्रियतेमुळे त्यांचं मानधनदेखील तितकचं जास्त असणार यात शंका नाही. विशेष म्हणजे मानधनाच्या बाबतीत रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या ‘खान’दानालाही मागे टाकलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान हे सरासरी एका चित्रपटासाठी ४० ते ५० कोटी रुपयांचे मानधन आकारतात. मात्र रजनीकांत हे एका चित्रपटासाठी तब्बल ६० कोटी रुपयांचं मानधन घेतात. इतकंच नाही तर चित्रपटाच्या कमाईमध्येही त्यांची अर्धी भागीदारी असते. त्यामुळे रजनीकांत हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता आहेत.

वाचा : एकदा नाही तर दोनदा झालं होतं रानू मंडल यांचं लग्न? जाणून घ्या खरं कारण

दरम्यान,काही दिवसांपूर्वी त्यांचा काला आणि 2.0 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे त्यांनी 2.0 या चित्रपटासाठी ४० दिवसांच्या चित्रीकरणासाठी ६५ कोटी रुपयांचं मानधन मागितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 11:13 am

Web Title: highest paid tamil actor rajinikanth ssj 93
Next Stories
1 एकदा नाही तर दोनदा झालं होतं रानू मंडल यांचं लग्न? जाणून घ्या खरं कारण
2 रानू मंडल यांच्या गाण्याची नक्कल करण्याविरोधात गुन्हा दाखल
3 प्रभाव प्रभासचा; साहोच्या एका तिकीटाची किंमत पाहून व्हाल थक्क
Just Now!
X