News Flash

करोनामुळे काम मिळतं नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो – हिमानी शिवपुरी

एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सगळे उद्योग बंद झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याच प्रमाणे बॉलिवूड सिनेसृष्टीचे देखील काम थांबवण्यात आले आहे. या सगळ्यामुळे फक्त चित्रपटसृष्टी नाही तर छोट्या पडद्यावरील अनेकांना काम मिळतं नाही. आता जेष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी करोना काळात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो या बद्दल सांगितले आहे.

हिमानी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी करोना काळात येणाऱ्या सगळ्या अडचणींबाबत सांगितले आहे. “हे खूप कठीण आहे. आम्ही कलाकार, विशेषत: वृद्ध, आम्ही जेव्हा काम करतो तेव्हाच आम्हाला पैसे मिळतात. परंतु आता, काम असताना देखील संघर्ष आहे,” असे हिमानी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “आमच्याकडे प्रॉव्हिडंट फंड किंवा केअर फंड नाही, ज्याचा वापर आम्ही अशा कठीण परिस्थितीत करु शकतो. मी अजूनही आशा सोडलेली नाही आणि मला खात्री आहे की एक दिवस सगळ्या गोष्टी ठीक होतील.”

हिमानी यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सल्ला दिला आहे की सध्याची वेळ योग्य नाही. प्रत्येकाने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. घरी रहा आणि सर्व खबरदारी घ्या. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी असणं गरजेचे आहे.

आणखी वाचा :  ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

हिमानी यांनी बॉलिवूडमधील ‘दिलवाले दुल्हिनया ले जाएंगे’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘हीरो नंबर 1’, ‘हम आपके हैं कौन’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 8:36 am

Web Title: himani shivpuri reveals there is no provident or care fund for actors and says it is very tough time dcp 98
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे मिलिंद सोमणचा प्लाझ्मा घेण्यास डॉक्टरांचा नकार; निराश मिलिंदची पोस्ट व्हायरल
2 सोनू सूद म्हणतो बेड दिला, स्थानिक प्रशासन म्हणतं आम्हाला काहीच कल्पना नाही!
3 ‘शेरनी’चा फर्स्ट लूक; विद्या बालन झळकणार दमदार भूमिकेत
Just Now!
X