31 October 2020

News Flash

‘हम आपके है कौन’च्या वेळी सलमानच्या त्या कृत्याने झाले होते आवाक, अभिनेत्रीने केला खुलासा

हिमानी शिवपुरी यांनी हा किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन १० ते २० वर्षी उलटली असली तरी आजही प्रेक्षक ते तितक्याच आवडीने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाताने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीच जादू केली होती. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी चित्रपटाच्या सेटवर घडलेला सलमानचा एक किस्सा सांगितला आहे.

‘माझ्या आजही लक्षात आहे, हम आपके है कौन या चित्रपटाच्या सेटवर मी सलमान खानला पहिल्यांदा भेटले होते. चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सची माझी ओळख करुन देण्यात आली होती. त्यामध्ये माधुरी देखील होती. पण सलमान त्याच्या एका सीनमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याची आणि माझी ओळख झाली नव्हती. आम्ही पहिल्यांदाच एकत्र एका सीनचे चित्रीकरण करत होतो’ असे हिमानी म्हणाल्या.

‘सीनचे चित्रीकरण सुरु असताना त्याने मला “चाची जान” म्हणून आवज दिला आणि उचलून घेतले. पहिले तर मी आवाक झाले. तो मला उचलून घेईल याचा मी विचारही केला नव्हता. कारण स्क्रिप्टमध्ये असे काही नव्हते. तसेच त्या सीनमध्ये आमची पहिल्यांदाच ओळख झाली होती. पण या सीननंतर आमच्यात एक चांगले नाते निर्माण झाले आणि सीनचे चित्रीकरण संपल्यावर आम्ही खळखळून हसत होतो’ असे हिमानी यांनी पुढे म्हटले.

View this post on Instagram

Gud wali morning!

A post shared by Himani Shivpuri (@hshivpuri) on

हिमानी शिवपुरी आणि सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यात एक चांगले नाते निर्माण झाले होते. ‘कुछ-कुछ होता है’, ‘बीवी नंबर 1’, ‘दुल्हन हम ले जायेंगे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये हिमानी यांनी काम केले आहे.

सध्या लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात हिमानी अनेक चित्रपट आणि शो पाहत आहेत. दरम्यान त्यांनी ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘सध्या लॉकडाउनमुळे सर्वचजण घरात आहेत. म्हणून मी या मिळालेल्या वेळात माझ्या “हप्पू की उलटन पलटन” या शोचे एपिसोड पाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माझे जुने चित्रपट देखील पाहात आहे. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेले किस्से आठवून माझ्या चेहऱ्यावर हसू येते’ असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 2:09 pm

Web Title: himani shivpuri says salman khan act shocked me during hum aapke hain kaun shooting avb 95
Next Stories
1 रणवीरच्या ‘या’ टोपीच्या किंमतीत तुमची संपूर्ण उन्हाळ्याची होईल शॉपिंग
2 माँ के हात का खाना! तब्बल ४६ वर्षानंतर ट्विंकलला मिळालं आईच्या हातचं जेवण
3 त्या ट्विटनंतर अकाऊंट डिलीट करण्याचे कारण सांगितले झायरा वसीमने
Just Now!
X