21 September 2020

News Flash

हिमानी शिवपुरी यांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे केली विनंती

हिमानी यांनी करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली

लॉकडाउननंतर छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. पण चित्रीकरण सुरु होताच सेटवर क्रू मेंबर्ससह अनेक कलाकरांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता हप्पू की उलटन पलटन या मालिकेतील अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

हिमानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा फोटो शेअर केला आहे. ‘शुभ सकाळ! माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी करोना चाचणी करुन घ्या’ असे म्हणत हिमानी यांनी विनंती केली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्यासोबत मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हिमानी यांना मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मी ६० वर्षांची असल्यामुळे डॉक्टरांनी मला दवाखाण्यात अॅडमीट होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झाले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात २२ हजार नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात २२,०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ३९१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांवर गेली असून, रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दिवसभरात १३,४८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७०.२ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत १० लाख ३७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले तर २९,११५ जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 8:59 am

Web Title: himani shivpuri tests positive for coronavirus avb 95
Next Stories
1 लग्नाआधीच महिमा होती प्रेग्नंट; या उद्योगपतीसोबत होतं अफेअर
2 चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले; महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी
3 एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; सात अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
Just Now!
X