News Flash

हिमांशला विसरुन नेहा बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात ?

दु:ख विसरुन नेहा पुढच्या वळणावर निघाली आहे.

नेहा कक्कड

गेल्या काही दिवसापासून कलाविश्वामध्ये गायिका नेहा कक्कडच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. अभिनेता हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर नेहा प्रचंड भावूक झाली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मला एकटं सोडा अस म्हणत जाहीर पत्रही लिहीलं होतं. ब्रेकअपचं दु:ख पचवणं तिला प्रचंड अवघड झालं होतं. मात्र आता हे दु:ख विसरुन नेहा पुढच्या वळणावर निघाली आहे. लिटील चॅम्पसच्या सेटवर नेहाने तिला आवडत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्याचं नाव जाहीर केलं.

नेहा सध्या लिटील चॅम्पस या कार्यक्रमाच्या परिक्षकाची जबाबदारी पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी नेहाने तिला रणबीर आवडत असल्याचं म्हटलं आहे.

‘बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत. प्रत्येक तरुणीच्या हृदयावर राज्य करणारा रणबीर माझाही आवडता अभिनेता आहे. मला तो आवडतो मात्र ही गोष्ट मी कधी त्याच्यासमोर व्यक्त केली नाही’, असं नेहा म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘काही मुली आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबूली देण्यासाठी घाबरतात. तसं माझंही काहीसं झालं आहे. मला तू आवडतोस मात्र हे सांगताना मला कायम भिती वाटत राहिली’.

दरम्यान, लिटील चॅम्प्सच्या सेटवर रणबीरसोबत डान्सही केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नेहाने ब्रेकअपचं दु:ख पूर्णपणे विसरुन आता ती स्थिरस्थावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:23 pm

Web Title: himansh kohli neha kakkar propose bollywood actor after breakup
Next Stories
1 Republic Day 2019 : देशभक्तीवर आधारित ‘हे’ पाच चित्रपट पाहाच
2 भारतात प्रथमच मायथॉलॉजी ब्रॉडवे म्युझिकल सादर करण्यास काजल मुगराई सज्ज
3 #10yearschallenge : असा झाला बॉलिवूडच्या तीन आघाडीच्या अभिनेत्रींचा उदय
Just Now!
X