News Flash

नेहा कक्करशी ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशने केलं ‘हे’ वक्तव्य

नेहा कक्कर व अभिनेता हिमांश कोहली यांचं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रेकअप झालं.

नेहा कक्कर, हिमांश कोहली

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व अभिनेता हिमांश कोहली यांचं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रेकअप झालं. कलाविश्वातील ‘क्यूट कपल’ म्हणून हे दोघे ओळखले जात होते. पण काही कारणास्तव यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअपनंतर नेहाने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली होती. इतकंच नव्हे तर त्या पोस्टमधून तिने हिमांशवर टीकासुद्धा केली होती. हिमांशने मात्र आतापर्यंत ब्रेकअपवर काहीच वक्तव्य केलं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अखेर त्याने नेहा कक्करशी असलेल्या नात्यावर मौन सोडलं.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना हिमांश म्हणाला, ”जे झालं ते झालं. मी त्या गोष्टी बदलू शकत नाही. मी अजूनही तिचा आदर करतो. वेळ जरी वाईट असेल तरी आपण दुसऱ्यांविषयी वाईट विचार करता कामा नये. ती उत्तम गायक असून एक व्यक्ती म्हणूनही चांगली आहे. यापुढील आयुष्यात तिला आनंद, सुख, समाधान मिळो अशी माझी इच्छा आहे.”

Video: दीपिकाचा ड्रेस पाहून सलमाननं दिलेली प्रतिक्रिया बघाच!

नेहाविषयी मनात कटूता नसल्याचं स्पष्ट करत भविष्यात तिच्यासोबत काम करेन असं तो म्हणाला. ”एखादी चांगली ऑफर मिळाली, तर मी भविष्यात तिच्यासोबत नक्कीच काम करेन. ‘ओह हमसफर’ हा आमचा अल्बम खूप गाजला. लोकांना आमची ऑनस्क्रीन जोडी आवडली. त्यामुळे यापुढे संधी मिळाली तर मी नक्की नेहासोबत काम करेन,” असं त्याने सांगितलं.

‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोमध्ये नेहा-हिमांशूने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:21 pm

Web Title: himansh kohli opens up about parting ways with neha kakkar ssv 92
Next Stories
1 रात्रीस खेळ चाले – २ : शेवंताचा खून की आत्महत्या
2 मराठी वेब सीरिजचा धुमाकूळ!
3 Laal Kaptan: नागा साधूच्या भूमिकेत सैफ; अंगावर काटा आणणारा ट्रेलर
Just Now!
X