News Flash

मी काही रानू मंडलचा मॅनेजर नाही, हिमेश संतापला

एका मुलाखतीमध्ये हिमेश संतापला आहे

सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडल यांचा काही महिन्यांपूर्वी कोलकाता रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने रानू मंडल यांना एका रात्रीतून स्टार बनवले. त्यांच्या आवाजाने त्यांनी बॉलिवूड अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियावर देखील जादू केली होती. त्याने रानू यांना त्याच्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली.

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचा काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका महिलेने रानू मंडल यांच्या हाताला स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी रानू मंडल यांना चांगलेच सुनावले होते.

नेटकऱ्यांनी रानू मंडल यांच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरली आहे, लोकप्रियता मिळाली की लोकांचे वागणे बदलते असे म्हणत रानू मंडल यांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते. नुकताच एका मुलाखतीमध्ये हिमेश रेशमीयाला सोशल मीडियावर रानू मंडल यांना करण्यात येणाऱ्या  ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हिमेशने दिलेल्या उत्तराने अनेकांना धक्का बसला आहे. ‘तुम्ही मला का विचारता? मी तिचा मॅनेजर नाही’ असे उत्तर हिमेशने दिले आहे.

दरम्यान रानू मंडल यांना लॉन्च करण्याबाबत ही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांने रानू मंडल या एकट्या गायिका नाहीत ज्यांना मी लॉन्च केले. आधी मी पलक मुच्चाल, दर्शन, आर्यन यांना देखील लॉन्च केले आहे असे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 5:49 pm

Web Title: himesh reshammiya reacts to ranu mondal getting trolled on social media avb 95
Next Stories
1 आशा भोसलेंनी सांगितली लता मंगेशकर रुग्णालयात असतानाची आठवण
2 लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील ‘तो’ फोटो होतोय व्हायरल
3 हिवाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी ‘हे’ सहा उपाय कराच
Just Now!
X