#MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकपदावरून माघार घ्यावी लागली. त्याने हा शो सोडल्यानंतर त्याच्याऐवजी कोणती व्यक्ती परीक्षकपदी दिसणार याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अनु मलिकऐवजी आता या कार्यक्रमात गायक हिमेश रेशमिया परीक्षकपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आता विशाल दादलानी आणि नेहा कक्कडसोबत हिमेश रेशमिया या पर्वात पाहायला मिळणार आहे.

२०१८ मध्ये #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यात गायिका सोना मोहपात्राने त्याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते. मात्र पुन्हा एकदा तो अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Had Historic fun judging the talents on sets of Indian Idol with Vishal, love you all cheers!

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

वाचा :  बल्लू, कांचा ते अहमद शाह अब्दालीपर्यंत, पाहा संजय दत्तचे खलनायक लूक

दरम्यान,‘इंडियन आयडॉलन’च्या अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जेव्हा अनु मलिक परतला, तेव्हा सोनाने सोशल मीडियाद्वारे पुन्हा मोहिम सुरु केली. अनु मलिकविरोधी तिच्या मोहिमेला सोशल मीडियावर अनेक महिलांचा पाठिंबा मिळाला. अखेर अनु मलिकने स्वत:तून माघार घेतली व शो सोडण्याचा निर्णय घेतला.