28 November 2020

News Flash

अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर; सहा महिन्यात १ कोटी लोक करु लागले फॉलो

अभिनेत्रीने सोशल मीडियावर ओलांडला १ कोटीचा आकडा

बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. परिणामी दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ होत आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वी तिने पाच मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स गोळा केले होते. अन् पाहता पहाता केवळ सहा महिन्यात आता तब्बल १० मिलियन म्हणजेच १ कोटी नेटकरी तिला फॉलो करु लागले आहेत. हिनाने एका खास पार्टीचं आयोजन करुन आपल्या मित्र-मंडळींसोबत हा आनंदाचा क्षण सेलिब्रेट केला. तिच्या या पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

हिना खान छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. करिअरच्या सुरुवातीस काही मालिकांमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची देखील भूमिका साकारली आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मालिकांसमोबतच ‘नच बलिये’, ‘बिग बॉस’, ‘बॉक्स क्रिकेट लीग’, ‘किचन चँम्पियन’ यांसारख्या रिअॅलिटी शोंमध्ये देखील ती झळकली आहे. ‘स्मार्टफोन’ आणि ‘डॅमेज’ या दोन वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. मुकेश भट्ट निर्मित ‘हॅक्ड’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 4:50 pm

Web Title: hina khan 1 crore followers on instagram mppg 94
Next Stories
1 पुढच्या वर्षी सुरु होणार अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे चित्रीकरण
2 ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली
3 सलमानची ही हिरोईन होती प्रभासची क्रश, ‘या’ चित्रपटात साकारणार आईची भूमिका
Just Now!
X