News Flash

“एका काल्पनिक कथेवर इतका गोंधळ का?”; एकताच्या समर्थनार्थ हिना खान मैदानात

हिना खाननं केलं एकता कपूरचं समर्थन; म्हणाली...

एकता कपूरची XXX ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधील काही दृश्यांना आक्षेपार्ह म्हणत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार केली होती. यानंतर एकताने माफी मागुन प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही तिच्यावर केली जाणारी टीका अद्याप थांबलेली नाही. परिणामी एकताच्या समर्थनार्थ आता अभिनेत्री हिना खान मैदानात उतरली आहे. “एका काल्पनिक कथेसाठी इतका गोंधळ का?” असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

“सैनिकांचा अपमान कोणीही सहन करु नये. अनवधानाने झालेल्या त्या चुकीला दुरुस्त करण्यात आलं आहे. परंतु एका महिलेला बलात्काराची धमकी दिली जातेय त्या बद्दल बोला. काल्पनिक कथानकासाठी एका महिलेच्या कुटुंबियांना धमकावणं योग्य आहे का? असा प्रश्न हिना खाननं उपस्थित केला आहे.” हिना हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हे प्रकरण काय आहे?

‘XXX’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैनिक सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आले आहे. या स्टोरीलाईमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे. असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 5:24 pm

Web Title: hina khan ekta kapoor xxx web series controversy mppg 94
Next Stories
1 रामायणातील सीतेने लहानपणीचा फोटो केला पोस्ट; नेटकरी म्हणाले..
2 “कृपया सोशल डिस्टंसिंग रखे…”; बिग बॉसच्या १४ व्या सीझनची भन्नाट थीम
3 लॉकडाउनमध्ये झी मराठीवर दोन नवीन मालिकांची पर्वणी
Just Now!
X