News Flash

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने याबाबत माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २० एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हिना खानच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे’ अशी माहिती विरल भय्यानीने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनेक कलाकारांनी विरलच्या या पोस्टवर कमेंट करत हिनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिना सध्या कामानिमित्त बाहेर गेली असून ती लवकरात लवकर घरी परत येण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिना बऱ्याच वेळा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती काही दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिने तेथील वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 7:29 pm

Web Title: hina khan father passes away due to cardiac arrest avb 95
Next Stories
1 जय भानुशाली लेकीच्या पाया पडला…पत्नी माहीने शेअर केला व्हिडिओ
2 तू तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत दिग्दर्शकावर झालेल्या वर्णभेदावर प्रियांकाने केले वक्तव्य
3 “तू म्हणजे कंगनाचं मेल व्हर्जन”; ट्रोलर्सला अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर!
Just Now!
X