‘बिग बॉग ११’ ची उपविजेती आणि छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ हिना खानवर आरोप करणाऱ्या ज्वेलर्सला हिनाने कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसचा एक फोटो हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केला आहे. काही दिवसापूर्वी एका ज्वेलर्सने हिनावर ११ लाखांचे दागिने परत न केल्याचा आरोप करत दागिने परत करण्याचे तसेच नुकसान भरपाईदेखील देण्याची मागणी केली होती. त्यामुळे याचं प्रत्युत्तर देण्यासाठी हिनानेही त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी हिनानं दागिने उधार घेतले होते. मात्र हा पुरस्कार सोहळा संपल्यानंतरही हिनाने ते दागिने परत केले नाही तसंच तिच्याकडे वारंवार दागिन्यांची मागणी करूनही तिने दुर्लक्ष करत दागिने आपल्या स्टाईलिस्टकडून हरवले आहेत अशी कारण दिली,असा आरोप ज्वेलर्सनं केला होता. मात्र ज्वेलर्सने केलेल्या या आरोपांमुळे आपली बदनामी होत असल्याचं सांगत हिनाने ज्वेलर्सलाच नोटीस पाठविली आहे.

‘मी पाठविलेली नोटीस मुद्दाम सोशल मीडियावर शेअर करत आहे. कारण या प्रकरणाची सुरुवात इथपासूनच झाली होती. माझ्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांनी ज्वेलर्सला कायदेशीर नोटी पाठविली आहे. काही जण बदनामी करण्याच्या हेतूने सेलिब्रेटींवर असे आरोप करत असतात. त्यामुळेच माझ्यावर हे आरोप करण्यात आले आहे. मात्र मी त्यांना योग्य आणि कायदेशीर भाषेतच उत्तर देणार’ असल्याचं यावेळी हिनाने सांगितलं.

दरम्यान, ज्वेलर्सने मला कोणतीच कायदेशीर नोटीस बजावली नसून माझी मानहानी केल्याप्रकरणी ज्वेलर्सने जाहीर माफी मागावी असं हिनाने सांगितलं आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan sends notice to the jwellery brand that alleged her for fraud
First published on: 22-07-2018 at 17:27 IST