News Flash

“इथे मी रोज त्यांना पाहू शकते”; वडिलांच्या निधनानंतर हिना खानने शेअर केला भावूक व्हिडीओ

हिना खानने दाखवली 'ती' जागा

(photo-instagram@realhinakhan)

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं निधन झालं आहे. या धक्क्यातून हिना आणि तिचं कुटुंब अद्याप सावरलेलं नाही. प्रत्येक क्षणी हिना तिच्या वडिलांना मिस करतेय. 20 एप्रिलला हिनाच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता.

हिना खानने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतही तिने वडिलांना मिस करत असल्याचं म्हंटलंय. हिनाने या व्हिडीओत ती वडिलांना कश्याप्रकारे रोज भेटते आणि त्यांच्याशी गप्पा मारते हे सांगितलं आहे. हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती उदास दिसतेय. बालकनीतून ती एका जागेकडे बोट दाखवतेय. ही तिच जागा आहे जिथे हिनाच्या वडिलांना दफन करण्यात आलं आहे. त्यामुळे बालकनीतून हिना रोज वडिलांची भेट घेते असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

या व्हिडीओ कॅप्शनमध्ये हिनाने भावूक पोस्ट लिहली आहे. ” मला इतर कोणताही विचार करणं शक्यच होत नाहिय. मी तुम्हाला खूप मिस करतेय डॅड. आणि अशा प्रकारे त्यांनी आमच्या जवळ राहणं निवडलं. त्यांनी कुटुंबाला एकटं सोडलं नाही. मी रोज त्यांना आमच्या बालकनीमधून पाहते. मला माहितेय तुम्ही आम्हाला पाहत आहात. तुमचं कुटुंब तुमच्यावर खूप प्रेम करतं डॅड” असं म्हणत हिनाने वडिलांना आपन रोज भेटतं असल्याचं या व्हिडीओतून दाखवून दिलंय.

वडिलांच्या निधनानंतर हिना खानने पुन्हा एकदा काम सूरू केलंय. काही दिवसांपूर्वीच तिने पाररंपरिक ड्रेसमध्ये फोटशूट केलं होतं. तेव्हीदेखील हिनाने वडिलांना मिस केलं होतं. इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर करत तिने वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:03 pm

Web Title: hina khan share emotional video where her dad was buried said i can see him everyday kpw 89
Next Stories
1 “पहिली गोष्ट तर तुम्ही सरकारवर टीका करू शकत नाही, मग….” ; फरहान अख्तरचे सरकारवर ताशेरे
2 ‘देवमाणूस’ मालिकेत डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका…
3 “किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल
Just Now!
X