News Flash

‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

उपरोधिक टोला लगावत व्यक्त केला राग

देशात सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. जवळपास १२० रुपये किलो या दराने कांदे विकले जात आहेत. कांद्याच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच आता सेलिब्रिटी देखील त्रस्त झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री हिना खान हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून “हा कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा” असा उपरोधिक टोला लगावत आपला राग व्यक्त केला.

‘जेम्स बॉण्ड’ बघितला आता त्याच्या भन्नाट गाड्याही बघा

हिनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हिनाचे वडिल दिसत आहेत. त्यांच्या हातात कांद्याने भरलेली एक टोपली आहे. आणि पाठीमागून हिनाचा आवाज येत आहे. “बाबा तुमच्या हातात एक अत्यंत महागडी वस्तू आहे. तिला लवकरात लवकर बँकेच्या तिजोरीत ठेवा अन्यथा ती चोरीला जाईल.” अशा मिष्किल शब्दात तिने कांद्याच्या वाढत्या भावावर टीका केली.

दिलीप कुमार यांनी दोन वेळच्या जेवणासाठी केले होते हॉटेलमध्ये काम

याआधी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने कांद्याच्या किंमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टोला लगावला होता. तिने कांद्याची तुलना अॅव्होकाडो या फळाशी केली होती. अॅव्होकाडो हे अत्यंत महागडे फळ आहे.

अशा वाढतात कांद्याच्या किमती

  •  कांदा बाजारातील काही मोठे व्यापाऱ्यांचे मध्यस्थ व दलालांशी संधान. हे दोन्ही घटक कांद्याच्या किमती वाढवण्यासाठी संगनमताने त्याची साठेबाजी करतात.
  • कांदा बाजाराच्या नाडय़ा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या हातात.
  • बहुतांश कांदा उत्पादक एक ते सव्वा एकर इतक्या कमी जमिनीवर शेती करीत असल्याने त्यांचे बाजारातील महत्त्व अत्यल्प असते. खराब हवामान आणि नाशवंत पीक यामुळेही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून घेता येत नाही.
  • विपणनाचा मोठा खर्च, अपुऱ्या बाजारपेठा, नव्या व्यापाऱ्यांना संधी न मिळणे, बाजारयंत्रणेत वारंवार होणारे संप या गोष्टींमुळेही कांद्याच्या किमती वाढतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:21 pm

Web Title: hina khan shares hilarious video on rising onion mppg 94
Next Stories
1 ‘कोंढाण्या’ला बॉलीवूडचे ग्लॅमर
2 समृद्ध करणारा सिनेमाचा अनुभव आयनॉक्सचे ‘मेगाप्लेक्स’
3 बाजीप्रभूंच्या यशोगाथेने पावन होणार रुपेरी पडदा
Just Now!
X