करोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. क्वारंटाइन वेळेत सामान्यांसह सेलिब्रिटी स्वत:ला घरातील कामांत किंवा छंद जोपासण्यात गुंतवून घेत आहेत. या वेळेत अभिनयाव्यतिरिक्त या सेलिब्रिटींमध्ये आणखी कोणती कला आहे, हे सोशल मीडियाद्वारे कळत आहे. काही सुरेल गाणी गात आहेत, तर काही जण सुंदर चित्र काढत आहेत. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री हिना खानने लॉकडाउनच्या काळात एक सुंदर स्केच काढले आहे.

चित्राच्या माध्यमातून हिनाने लॉकडाउनची परिस्थिती मांडली आहे. हिनाच्या या स्केचची नेटकऱ्यांकडून प्रशंसा केली जात आहे. ‘जे हजार शब्दांच्या कथेतूनही स्पष्ट होत नाही ते या एका चित्रातून सहज कळतंय. भारत देश आणखी एका कठीण आव्हानाला सामोरं जात असल्याची ही वेळ आहे. आपण या आव्हानांना सामोरं जाऊया आणि लढूया’, असं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

आणखी वाचा : सई ताम्हणकर मदतीला सरसावली पुढे

अभिनेत्री मौनी रॉयनेही या स्केचला लाइक केलं असून कमेंटमध्ये ‘लव्ह’ सिम्बॉल पोस्ट केला आहे. हिनाने याआधीही काही स्केच केले आहेत. मात्र तिच्या या स्केचने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.