29 October 2020

News Flash

११ लाखांचे दागिने हिनानं परत केलेच नाही, ज्वेलर्सचा आरोप

तिच्याकडे वारंवार दागिन्यांची मागणी करूनही तिनं ते परत केले नाही. हे दागिने आपल्या स्टाईलिस्टकडून हरवले असंही हिनानं सांगितलं.

हिना खान

‘बिग बॉग ११’ ची उपविजेती आणि छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ हिना खान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जवळपास ११ लाखांचे दागिने तिने एका पुरस्कार सोहळ्यासाठी ज्वेलर्सकडून घेतले होते. मात्र तिनं ते वेळेवर परत केले नाही असा आरोप ज्वेलर्सनं केला असून तिला रितसर नोटीस बजावली आहे. हे दागिने परत करण्याचे तसेच नुकसान भरपाईदेखील देण्याची मागणी ज्वेलर्सनं केली आहे.

‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी हिनानं दागिने उधार घेतले होते. मात्र हा पुरस्कार सोहळा संपून बराच काळ लोटला मात्र तिनं अजूनही दागिने परत केले नाही असा आरोप ज्वेलर्सनं केला आहे. तिच्याकडे वारंवार दागिन्यांची मागणी करूनही तिनं ते परत केले नाही. हे दागिने आपल्या स्टाईलिस्टकडून हरवले असंही हिनानं सांगितलं. हे दागिने कायमस्वरूपी विसरून जा नाहीतर परिमाण वाईट होतील अशाही धमक्या हिनानं दिल्याचा आरोप ज्वेलर्सनं केला आहे.

त्यामुळे या प्रकरणात आता ज्वेलर्सनं तिला कायदेशीर नोटीस बाजावली आहे. हिनानं दागिने परत करावे किंवा दागिन्यांची मूळ रक्कम भरावी. लेखी माफीनामा द्यावा तसेच दोन लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी ज्वेलर्सनं केली आहे. मात्र हिनानं ज्वेलर्सनं केलेले आरोप फेटाळले आहेत. मला कोणतीही नोटीस आली नाही. केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न माझ्या विरोधकांचा आहे असा प्रत्यारोप तिनं केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 6:27 pm

Web Title: hina khan slapped with legal notice for not returning jewellery
Next Stories
1 स्ट्रीट फाईटर ते अब्जाधीश…. जाणून घ्या ‘द रॉक’चा प्रवास
2 सावळ्या रंगामुळे प्रियांकानं गमावला असता ‘मिस इंडिया’चा किताब
3 अन् प्रियांकाला मिळाले ११ हजार पुष्पगुच्छ, १८ हजार पत्र आणि बरंच काही….
Just Now!
X