News Flash

‘हाच आमच्यात आणि स्टारकिडमध्ये फरक आहे’; घराणेशाहीवर हिना खान व्यक्त

'प्रत्येकाच्या आयुष्यातील करिअरचा संघर्ष वेगवेगळा असतो'

‘बिग बॉस’ फेम हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मादक अदा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर हिना खानने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा गाजवणारी ही अभिनेत्री अनेक वेळा सोशल मीडियावर तिची मत निर्भीडपणे मांडत असते. त्यातच आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बिग बॉस’, ‘कसौटी जिंदगी की’ या कार्यक्रमामधून अभिनयाची झलक दाखविणारी हिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तिने घराणेशाहीवर मत व्यक्त केलं आहे.

“प्रत्येकाच्या आयुष्यातील करिअरचा संघर्ष वेगवेगळा असतो. काहींच्या वाट्याला अनेक चढ-उतार येतात. तर काहींना प्रत्येक गोष्ट सहज मिळते. या सगळ्यामागे अनेक कारणं आहेत. तुम्हालाच संधी मिळेल हे दरवेळी गरजेचं नाही. काही वेळा तुम्हाला संधी मिळते, मात्र तुम्ही स्वत: ला १०० टक्के सिद्ध करण्यासाठी कमी पडता. असं बऱ्याच वेळा घडतं. तुम्ही फार उत्तम कलाकार आहात, मात्र तुमच्याकडे एक खास विशेषाधिकार नसतो. त्यामुळे इतरांना मिळतात अशा संधी तुम्हाला मिळत नाही. हा सगळ्या संघर्षाचा भाग आहे. जर माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात केली. मी चित्रपट, वेबसीरिज केले. लघुपटात काम केलं.म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलं आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करते.मी १० चित्रपट किंवा काही म्युझिक अल्बममध्ये काम केलं तरीसुद्धा प्रत्येकवेळी माझा अभिनय उत्तम असला पाहिजे याकडे माझं लक्ष असतं. जर मी चांगलं काम केलं तरच लोकांचं लक्ष माझ्याकडे जाणार आहे. एखाद्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याला आपला अभिनय आवडावा यासाठी आम्हाला फार मेहनत करावी लागते”, असं हिना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “सध्या घराणेशाहीचा मुद्दा सुरु आहे, त्यावर मलाच एकच सांगावसं वाटतं. जे स्टारकिड्स असतात किंवा ज्यांचा कलाविश्वात सतत वावर असतो, त्यांना या क्षेत्रात विशेष महत्त्व असतं. त्यांच्याकडे १० चित्रपट असतील आणि त्यातील एखादा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तर त्यांना फरक पडत नाही. पण जर मी एखादा मोठा चित्रपट केला आणि तो अपयशी ठरला तर मला परत नवीन संधी मिळणार नाही. हाच एक फरक आहे. त्यांचा चित्रपट यशस्वी ठरो न ठरो त्यांच्याकडे नवीन चित्रपट तयार असतो. कोणीच जन्मत: हुशार नसतं. स्टारकिडचे पहिले चित्रपट पाहा आणि आताचे फार फरक जाणवतो. हाच फरक माझ्याबाबतीतही लागू आहे”.

दरम्यान, हिना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून अनेक वेळा ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. त्यातच तिने केलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा तिची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 1:05 pm

Web Title: hina khan speaks on nepotism star kids and her career ssj 93
Next Stories
1 लग्नाविषयी सुशांतचा असा होता प्लान; वडिलांचा खुलासा
2 ‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ शब्द वगळणार; सोनाली कुलकर्णीने व्यक्त केला आनंद
3 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा
Just Now!
X