News Flash

अभिनेत्री हिना खानला करोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

सोशल मीडियावरून दिली माहिती

देशात करोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. यात महाराष्ट्राला करोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ अधिक बसली आहे. मुंबईतही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येतेय. तर गेल्या काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली असून दिवसेंदिवस नव्या कलाकारांना करोना लागण झाल्याचं वृत्त समोर येतंय. यातच आता अभिनेत्री हिना खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनामुळे हिना खान आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आता हिनाला करोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. “सध्या मी आणि माझं कुटुंब कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाच माझा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाईन झाले असून सर्व प्रोटोकॉलचं पालन करतेय. जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांना विनंती करते की त्यांनी करोना चाचणी नक्की करून घ्यावी. तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.” अशी पोस्ट हिनाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

21 एप्रिलला हिना खानच्या वडिलांचं कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं होतं. यावेळी हिना खान तिच्या एका प्रोजेक्टच्या शुटींगसाठी काश्मिरमध्ये होती. वडिलांच्या निधनानंतर चार दिवसांनी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवस सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं.

”माझे वडिल 21 एप्रिल 2021 रोजी स्वर्गवासी झाले. ज्यांनी ज्यांनी माझ्या या कठिण काळात माझं सांत्वन केलं, त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटूंब अजुनही सावरू शकलो नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस मी सोशल मिडीयावरून ब्रेक घेतेय. माझी टीम माझ्या सर्व प्रोजेक्टबद्दल माहिती देईल. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार. ” असं ती या पोस्टमध्ये म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 8:30 am

Web Title: hina khan tested covid 19 positive father passed away recently kpw 89
Next Stories
1 ‘नोमॅडलॅण्ड’चे ऑस्करवर वर्चस्व
2 धकधक गर्लने घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस
3 मुलाचं नाव AbRam का ठेवलं?; शाहरुख खानने केला खुलासा
Just Now!
X