News Flash

Kasautii Zindagii Kay 2: टीममधल्या ‘या’ कलाकाराला मिळालं सर्वाधिक मानधन

तिची छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी पाहता इतकं मोठं मानधन प्रत्येक भागासाठी देण्याचं एकतानंही मान्य केलं आहे.

काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा अनुरागच्या जोडीबरोबरच कोमोलिका ही खलनायिकाही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. आता कसौटीचा रिमेक येत आहे या नव्या मालिकेतील दोन मुख्य कलाकारांच्या नावावरून पडदा उठला आहे. मात्र छोट्या पडद्यावरची सर्वात प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोमोलिकाची भूमिका साकारणार कोण याबद्दल अजूनही संभ्रम आहे.

काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ हिना खानचं नाव चर्चेत होतं. नंतर अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाच्या नावाचीही चर्चा कोमोलिकाच्या भूमिकेसाठी झाली. मात्र कोमोलिकाच्या भूमिकेबाबत कमालिची गुप्तता एकता कपूरकडून पाळण्यात येत आहे. तेव्हा कोमोलिका साकारणार कोण याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पण आता हिनाच ही भूमिका साकारत असून तिनं प्रत्येक एपिसोडसाठी २.२५ लाख रुपये मानधन म्हणून मागितले आहे. तिची छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी पाहता इतकं मोठं मानधन प्रत्येक भागासाठी देण्याचं एकतानंही मान्य केल्याचं स्पॉटबॉय ई डॉट कॉमनं म्हटलं आहे. त्यामुळे हिना ही सर्व कलाकारांच्या टीममध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 6:40 pm

Web Title: hina khan the highest paid actress in kasauti zindagi kay 2
Next Stories
1 मंदिरात गेल्यामुळे सारा अली खानवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, दिला नाव बदलण्याचा सल्ला
2 ‘टेक केअर गुड नाइट’मध्ये महेश मांजरेकर यांची खास भूमिका
3 ‘यू अॅण्ड मी’ मध्ये पुन्हा जमणार शनाया-इशाची जोडी
Just Now!
X