News Flash

“पूर्व जन्माच्या कर्मामुळे काम मिळतय”; सोनम कपूरच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा संताप

वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देणं सोनम कपूरला पडलं भारी; होतेय ट्रोल

“पूर्व जन्माच्या कर्मामुळे काम मिळतय”; सोनम कपूरच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा संताप

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक स्टार किड्सला सोशल मीडियाद्वारे ट्रोल केले जात आहे. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान अभिनेत्री सोनम कपूरने वडिल अनिल कपूर यांना फादर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते. मात्र या ट्विटमुळे घराणेशाहीविरोधात सुरु असलेला वाद आणखी पेटला. तिच्या या ट्विटवर हिना खानच्या बॉयफ्रेंडने संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाली सोनम कपूर?

“फादर्स डेच्या निमित्ताने मला सांगायचंय, हो मी माझ्या वडीलांची मुलगी आहे. त्यांच्यामुळेच मी इथे आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. स्वत:ची ओळख सांगण्यात मला कुठल्याही प्रकारचा अपमान वाटत नाही. माझ्या वडीलांनी खूप मेहनतीनं आम्हाला या ठिकाणी आणून ठेवलं आहे. हे माझं कर्म आहे की मी त्यांच्या घरात जन्मला आले.” अशा आशयाचे ट्विट सोनमने केले.

सोनमच्या या ट्विटवर हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालनं संताप व्यक्त केला आहे. “अच्छा तर या स्टार किड्सला जे काम मिळतंय ते घराणेशाहीमुळे नव्हे तर त्यांच्या पूर्व जन्माच्या कर्मामुळे? असं असेल तर या जन्मातील त्यांची कर्म पाहून त्यांच्या पुढच्या जन्माचा अंदाज आपण लावू शकतो. सोनम कपूर, मला तुमच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा होती. पण तुम्ही तुमच्या वडीलांच्या नावाचा वापर केलात.” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 7:41 pm

Web Title: hina khans boyfriend calls out sonam kapoor for her fathers day tweet mppg 94
Next Stories
1 सलमान आणि सुशांतचा जुना व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा केआरकेवर निशाणा
2 क्वारंटाईनमुळे चित्रपट निर्मात्याची आत्महत्या; २७व्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं आयुष्य
3 ‘breathe in to the shadows’चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ