News Flash

मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये सनी लिओनीची वर्णी?

सनीच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सनी लिओनी, मीना कुमारी

‘ट्रेजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांच्या काही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. त्यांनी साकारालेली ‘पाकिजा’ तर कोणीच विसरु शकले नाही. चित्रपटरसिकांचे भान हरपणाऱ्या या सौंदर्यवतीचे आयुष्य रुपेरी पडद्यावर जितके मोहक वाटत होते, खासगी आयुष्यात मात्र तसे नव्हते. अभिनयासोबतच शेरो-शायरी करणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्यामुळे त्या खचल्या होत्या. त्याच सर्व गोष्टी आणि या अभिजात सौंदर्य लाभलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या भूमिकेसाठी ‘बेबी डॉल’ सनी लिओनीची वर्णी लागल्याचे म्हटले जातेय.

मीना कुमारी यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री विद्या बालनपुढे एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, विद्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्यामुळे आता थेट सनीला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. सनीच्या आधी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि कंगना रणौत यांनाही मीना कुमारी यांची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आले होते. पण, काही कारणास्तव या दोन्ही अभिनेत्रींनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला.

वाचा : विराटआधीही हे क्रिकेटर होते अभिनेत्रींच्या प्रेमात

‘नवभारत टाइम्स’ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक करण राजदान यांनी सनीसमोर चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला असून, सनीला चित्रपटाची कथाही भावली असल्याचे समजते. त्यामुळे आता सनी तिचा अंतिम निर्णय कधी देते याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सनीने आतापर्यंत साकारालेल्या भूमिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तिची प्रतिमा पाहता मीना कुमारी यांची भूमिका साकारणे तिच्यासाठी आव्हानात्मक असेल यात शंकाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:20 am

Web Title: hindi film actress meena kumari biopic vidya balan out sunny leone in
Next Stories
1 बहारदार ‘चतुरंगी’ कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
2 पाऊले चालती..
3 मधुकर धुमाळ यांच्या सुरेल सनई वादनाने सवाई गंधर्व महोत्सवाला प्रारंभ
Just Now!
X