05 March 2021

News Flash

डहाणूकर कॉलेजची ‘लौट आओ गौरी’ अव्वल

अस्तित्व, आयएनटी आणि साठे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खुल्या हिंदूी एकांकिका स्पर्धेवर महाविद्यालयीन रंगकर्मींनी आपला ठसा उमटविला.

| October 5, 2014 01:01 am

अस्तित्व, आयएनटी आणि साठे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खुल्या हिंदूी एकांकिका स्पर्धेवर महाविद्यालयीन रंगकर्मींनी आपला ठसा उमटविला. विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या नाटय़गृहात सादर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत म. ल. डहाणूकर महाविद्यालयाने सादर केलेली ‘लौट आओ गौरी’ ही एकांकिका प्रथम तर विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या ‘महिला हक्क संरक्षण कलम ४९८-अ’ची ‘वेटिंग रुम’ ही एकांकिका दुसरी आली.
अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून अमित जयरथ व संतोष तिवारी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यंदा नववे वर्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रात खुल्या गटासाठी होणारी ही एकमेव हिंदूी एकांकिका स्पर्धा आहे. स्पर्धेतील अन्य विजेते पुढीलप्रमाणे : सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- पराग ओझा, कृणाल आळवे, सुशील जाधव (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट अभिनेता- विभव जाधव (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट लेखक-आनंद म्हसवेकर (वेटिंग रुम), लेखनाचा विशेष पुरस्कार-ऋषिकेश जोशी (जोशी-बेडेकर महाविद्यालय-जिगरी), सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना-जयदीप आपटे (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट नैपथ्य-हर्षद, विलास (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट संगीत-श्रेयस राजे (जिगरी).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2014 1:01 am

Web Title: hindi one act play at dahanukar college
टॅग : Entertainment
Next Stories
1 व्हीजे अँडी आणि कामिया पंजाबीकडून ‘बिग बॉस’ स्पधर्काना धडे
2 चंद्रपूरची आई व मुलगी ‘कौन बनेगा करोडपती’त
3 अजय देवगण दुसऱ्यांदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत!
Just Now!
X