News Flash

एकता कपूरने केला भारतीय सैनिकांचा अपमान?; ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केली पोलीस तक्रार

"हिंदुस्तान तुला माफ करणार नाही"

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर आता एकता कपूरने आपले लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवलं आहे. तिने ‘अल्ट बालाजी’ नामक एक वेब सीरिज अ‍ॅप देखील सुरु केलं आहे. या अ‍ॅपला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावर दाखवल्या जाणाऱ्या एका सीरिजमधून भारतीय जवानांचा अपमान करण्यात आला अशी टीका हिंदुस्तानी भाऊने केली आहे. त्याने या प्रकरणावरुन एकता कपूर विरोधात पोलीस तक्रार देखील केली आहे.

हिंदुस्तानी भाऊ हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने एकताच्या ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजवर संताप व्यक्त केला आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला असा आरोप त्याने केला आहे. ‘ट्रिपल एक्स’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैनिक सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आले आहे. या स्टोरीलाईमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे. असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

हिंदुस्तानी भाऊने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन या तक्रारीबाबत माहिती दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रींच्या मादक दृश्यांमुळे ‘ट्रिपल एक्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 5:55 pm

Web Title: hindustani bhau files a police complaint against ekta kapoor mppg 94
Next Stories
1 झी मराठीवर मर्यादित भागांच्या नव्या मालिका
2 जेनेलिया की मार्व्हल? नेमकं तुझ्या आईचं नाव काय? ; रितेशला पडला प्रश्न
3 अभिनेत्री मोहेना कुमारीला झाली करोनाची लागण; कुटुंबियांसह १७ जाणांना केलं क्वारंटाईन
Just Now!
X