News Flash

‘रेस ३’ मधल्या पहिल्या गाण्याचा टिझर पाहिलात का ?

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यामातून सलमान खान परत एकदा आपल्या साहसदृश्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.

रेस ३

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक अशा सरस कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यामातून सलमान खान परत एकदा आपल्या साहसदृश्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. इतकंच नाही तर श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिनही आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सा-यांना भुरळ घालणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘रेस ३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून नुकताच या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘रेस ३’ मधील पहिल्या-वहिल्या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘हिरीए’ असे या गाण्याचे बोल असून यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा पोलडान्स करताना दिसून येत आहे. गाण्याच्या चित्रिकरणासाठी जॅकलिनने विशेष मेहनत घेतली असून तिने खास या गाण्यासाठी पोलडान्स शिकल्याचे सांगण्यात येत आहे. पोलडान्स शिकत असतानाचे काही व्हिडिओही जॅकलिनने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. ‘हिरीए’ हे एक पार्टी साँग असून यात जॅकलिनचं नाही तर सल्लूमियॉदेखील ठुमके लावणार आहे.

मीत ब्रोज यांनी हे गाणं कंपोज केलं असून दीप मोनी आणि नेहा भसीन यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हा चित्रपट साहसदृश्यांनी परिपूर्ण असा चित्रपट असून यामध्ये सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह अशी तगडी स्टारकास्ट आहे.
‘रेस ३’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर काही प्रेक्षकांनी उचलून धरला तर काही प्रेक्षकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठविली. मात्र एवढे असूनही केवळ २ दिवसांमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरला ३.१४ कोटी व्ह्युज मिळाले आहे. त्यामुळे आता या गाण्याच्या टिझरला किती व्ह्युज मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 9:49 am

Web Title: hiriye song teaser movie race 3
Next Stories
1 फ्लॅशबॅक : नसिरचे काही दुर्मिळ चित्रपट…
2 Top 10 News: इरफान खानच्या ट्विटपासून ते राजेश- रेशमविरुद्धच्या तक्रारीपर्यंत
3 ‘ब्लू प्लॅनेट २’ सिनेमाच्या प्रिमीयरला या कलाकारांची लावली हजेरी
Just Now!
X