गेल्या काही दिवसांपासून एकता कपूरचा डिजिट चॅनेल अल्ट बालाजीवर प्रदर्शित झालेली सीरिज ‘हिज स्टोरी’ चर्चेत आहे. या चर्चा या सीरिजचे पोस्टर चोरल्याचा आरोप केल्यानंतर सुरु झाल्या होत्या. आता या प्रकरणी अल्ट बालाजीने माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी एकता कपूरने आगामी वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर ‘हिज स्टोरी’चे पोस्टर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘हिज स्टोरी’ ही वेब सीरिज समलैंगिक जोडप्यावर आधारित आहे. या सीरिजच्या पोस्टरमध्ये अभिनेता मृणाल दत्त आणि सत्यदीप मिश्रा दिसत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २०१५मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘LOVE’चे दिग्दर्शक सुधांशू सरिआ आणि जहान बक्षी यांनी पोस्टर कॉपी केल्याचा आरोप केला.

आणखी वाचा: ‘कोणालाही न सांगता तिने…’, साजिदच्या पत्नीनेच वाजिदला केली होती किडनी दान

आता अल्ट बाजालीने पोस्ट शेअर करत माफी मागितील आहे. ‘९ एप्रिल रोजी आम्ही हिज स्टोरीचे पोस्टर प्रदर्शित केले आणि तेव्हा आम्हाला सुधांशु यांचा चित्रपट LOVE बाबत कळाले. दोन्ही पोस्टर सारखेच दिसणे हा कोणता योगायोग नाही. ही आमच्या डिझाइन टीमची चुकी आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘आम्ही प्रत्येक डिझायनरचा आदर करतो. कोणाच्याही कामाचा अनादर करत नाही. त्यामुळे पोस्टर बनवणाऱ्या आर्टिस्टने माफी मागणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन हे पोस्टर हटवले आहे आणि आम्ही LOVE चित्रपटाचे अतिशय सुंदर पोस्टर बनवणाऱ्या सर्व आर्टिस्टची माफी मागतो’ असे पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्टर चोरीची ही पहिलच वेळ नाही या आधी ‘द मॅरीड वुमन’ या सिनेमाच्या पोस्टरवरूनही वाद निर्माण झाला होता. एकता कपूरच्या ‘हिज स्टोरी’ या वेब सीरिजमध्ये एका साधारण कुटुंबातील पुरुषाचे समलैंगिक संबंध आणि ते काळाल्यानंतर त्याच्या पत्नीला बसलेला धक्का, कुटुंबासमोर उभे राहिलेले प्रश्न, त्यातून निर्माण झालेला तणाव हे कथानक पाहायला मिळणार आहे.