News Flash

ब्रॅड पीटला शाहरुख देणार नृत्याचे धडे!

'बॉलिवूडमध्ये आम्ही सर्वांनाच नाचवतो'

ब्रॅड पीट, शाहरुख खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत असतोच. पण, सध्या तो चर्चेत येण्यामागचं कारण आहे अभिनेता ब्रॅड पीट. हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट नुकताच भारतात आला असून, त्याच्या येण्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आहे. ब्रॅडने प्रसारमाध्यमं आणि उगाच होणारा गवगवा टाळण्यासाठी त्याच्या भारत दौऱ्याची वाच्यता केली नव्हती असं सांगण्यात येत आहे. त्याच्या येण्याने अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. त्यातही शाहरुख आणि ब्रॅडच्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले.

‘वॉर मशिन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ब्रॅड भारतात आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी सध्या हा हॉलिवूड अभिनेताही बराच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. टोकियोमध्ये या चित्रपटाच्या प्रिमियरनंतर ब्रॅडने अचानक भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्याच्या येण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेतही काही निवडक चेहरेच पाहायला मिळाले. याच पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर या ग्लोबल स्टारचे बरेच फोटो व्हायरल झाले. त्याच फोटोंमधील शाहरुख आणि ब्रॅडच्या फोटोला बरेच लाइक्स आणि शेअर्सही मिळाले आहेत.

वाचा: सुहानाबद्दलच्या या गोष्टी माहितीयेत का?

इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोसोबत शाहरुखने ब्रॅडची भेट घेतल्याचा आनंदही व्यक्त केला. या सरप्राइज भारत दौऱ्यापूर्वी ब्रॅड २००६ मध्ये भारतात आला होता. दरम्यान, ‘वॉर मशिन’ च्या निमित्ताने सध्या भारतात असलेल्या ब्रॅडने एका कार्यक्रमात शाहरुखसोबत गप्पाही मारल्या. यावेळी आपल्याला बॉलिवूड कलाकारांप्रमाणे नाचता आणि गाता येत नाही, असं तो म्हणाला आणि मग काय शाहरुखने चक्क त्याला नाचवण्याचा विडाच उचलला. ‘आम्ही तुम्हाला नाचायला शिकवू… बॉलिवूडमध्ये आम्ही सर्वांनाच नाचवतो’, असं शाहरुख म्हणाला. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या कलाकारांच्या या भेटीमध्ये ब्रॅडच्या चित्रपटाविषयीही चर्चा झाली.

वाचा: बॉलिवूडच्या ‘किंग’चे इंग्रजीचे मार्क्स पाहिले का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 11:58 am

Web Title: hollywood actor brad pitt to promote netflix in india and met bollywood actor shah rukh khan
Next Stories
1 BLOG : मराठी चित्रपट तारुण्यात आलाय… हे पटतंय ना?
2 Sachin A Billion Dreams : ‘सचिनसारखा क्रिकेटपटू असलेल्या देशात जन्मल्याचा अभिमान’
3 Sachin A Billion Dreams VIDEO : प्रिमियरमध्ये कलाकारांच्या मांदियाळीतही सचिनचे सारावरच लक्ष