सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसची भीती पाहायला मिळते. अनेक सामन्य माणसांसोबतच अनेक दिग्गजांना देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. आता हॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या मुलीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने हा खुलासा केला आहे.
अभिनेता मेट डेमनने एका मुलाखतीमध्ये मुलीला करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. मेटची मुलगी अॅलेक्सिया सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि करोनाची शिकार झाली आहे. तिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याचे मेटने सांगितले. ‘अॅलेक्सिया सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या ती ठिक आहे’ असे त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. मेटने त्याच्या मुलीसोबतच तिच्या रुममेटला देखील करोना झाल्याचे सांगितले आहे.
सध्या लॉकडाउनमुळे मेट डेमन आयर्लंडमध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. तर त्याची मुलगी न्यूयॉर्कमध्ये आहे. मेटने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या कंटेजन या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट २०११मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करोनासारख्या व्हायसरविषयी माहिती देण्यात आली होती. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 1:46 pm