25 October 2020

News Flash

स्ट्रीट फाईटर ते अब्जाधीश…. जाणून घ्या ‘द रॉक’चा प्रवास

प्रेक्षकच माझ्यासाठी सर्वकाही आहेत. या जगालाच मी माझ्या वरिष्ठांचा दर्जा दिला आहे.

द रॉक

WWE स्टार म्हणून ओळखला जाणारा ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉक अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी असतो. सध्याच्या घडीला रॉकने WWE मधून काढता पाय घेतला असता तरीही कलाविश्वात मात्र तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड कलाकारांच्या यादीत ड्वेन जॉन्सन पाचव्या स्थानी असल्याचं कळत आहे.

२०१८ या वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० सेलिब्रिटींच्या यादीत रॉकला पाचवं स्थान मिळालं आहे. गेल्या वर्षभरात त्याने जवळपास ८५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा आकडा सध्या अनेकांनाच थक्क करत आहे.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

खुद्द ड्वेननेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी एक पोस्ट व्यक्त करत आपला आनंद व्यक्त केला. ‘मी खूप मेहनत केली होती. पण, स्वप्नातही फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत माझ्या नावाचा समावेश होईल याचा विचार मी केला नव्हता. हारवर्ड विद्यापीठातून मी शिक्षण घेतलेलं नाही. पण, व्यवसायातील काही महत्त्वाच्या गोष्टी मी माझ्या अपयशातूनच शिकलो आहे. जेव्हा मी स्थानिक पातळीवर बाजारांमध्ये कुस्ती खेळायचो तेव्हा प्रत्येक सामन्यातून ४० डॉलर कमवायचे हेच माझं लक्ष्य असायचं. आज मी आयुष्यात ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे, तेथे प्रेक्षकच माझ्यासाठी सर्वकाही आहेत. या जगालाच मी माझ्या वरिष्ठांचा दर्जा दिला आहे. तुम्हाला आनंद देण्यात मी समर्थ आहे, तरच मी खऱ्या अर्थाने यशस्वी आहे. मी एक असा व्यक्ती आहे, ज्याने अवघ्या सात डॉलर्सच्या कमाईपासून सुरुवात केली होती. मी सर्वांचाच खूप खूप आभारी आहे’, असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 6:20 pm

Web Title: hollywood actor the rock dwayne johnson wwe top 100 highest earned celebrities list of forbes
Next Stories
1 सावळ्या रंगामुळे प्रियांकानं गमावला असता ‘मिस इंडिया’चा किताब
2 अन् प्रियांकाला मिळाले ११ हजार पुष्पगुच्छ, १८ हजार पत्र आणि बरंच काही….
3 Full Tight : मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी मराठी वेब सीरिज
Just Now!
X