News Flash

“मला न विचारताच डॉक्टरांनी ब्रेस्ट साइज वाढवली”; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

"कारण डाक्टरांना वाटलं..."

अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या चार दशकात शेरॉनने अनेक सुपरहिट सिनेमांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. शेरॉन स्टोन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेरॉनने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ या पुस्तकात शेरॉन तिच्या आयुष्यात घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

पिपल्स मॅगझीनच्या वृत्तानुसार शेरॉनने डॉक्टरांनी तिची परवानगी न घेताच ब्रेस्ट इम्पांट केल्याचं या पुस्तकात म्हंटलं आहे. शेरॉनने या पुस्तकात तिच्या एका सर्जरीचा अनुभव सांगितला आहे. यात डॉक्टरांनी न विचारताच ब्रेस्टचा आकार वाढवल्याचं तिने सांगितलं आहे. शेरॉनला ट्यूमर असल्यानं तिला ब्रेस्ट सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीवेळी डाक्टरांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता तिच्या ब्रेस्टची साइज म्हणजेच स्तनांचा आकार वाढवल्याचं ती म्हणाली आहे.

सर्जरीनंतर स्तनांचा आकार वाढल्याचं शेरॉनच्या लक्षात आलं. तिने डॉक्टरांना यावर प्रश्न विचारला. यावर डॉक्टरांनी दिलेलं उत्तर आश्चर्यकारक होतं असं ती म्हणाली. डॉक्टरांना वाटलं मला मोठी ब्रेस्ट चांगली दिसेल त्यामुळे त्यांनी आमच्यात जे ठरलं होतं तसं न करता स्वत:च्या मनाने ब्रेस्ट साइज वाढवली.” असं शेरॉन म्हणाली.

“आणि ‘बेसिक इंस्टिक्ट’चा तो सीन पाहून बसला धक्का! ”

शे़रॉन स्टोन हिने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक घटनांवर याआधी देखील भाष्य केलं आहे. या घटना तिने तिच्या ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ य़ा पुस्तकात मांडल्या आहेत. यात तिने तिचा लोकप्रिय सिनेमा ‘बेसिक इंस्टिंक्ट’ मधील एक अनुभन मांडला आहे. शेरॉनने म्हंटल आहे की या सिनेमातील एक दृश्य तिच्या नकळत चित्रित करण्यात आलं आहे. तिने सांगितलं आहे कि, ज्या फेमस दृश्यात तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्यात आले आहेत. ते दृश्य तिला न सांगताच शूट करण्यात आलं होतं. तिने सांगितलं कि, हे दृश्य तिने थेट सिनेमाच्या पहिल्या शोमध्ये पाहिलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharon Stone (@sharonstone)

दिग्दर्शकाच्या कानशिलात लगावली
या घटनेनंतर शेरॉनने दिग्दर्शकाच्या कानशिलात लगावल्याचं तिने म्हंटलं आहे. या सिनसाठी दिग्दर्शकाने म्हंटलं होतं.”आम्ही काही पाहू शकत नाही. फक्त तू तुझी अंडरवियर काढ. कारण ती पांढरी असल्याने रिफ्लेक्ट होतेय.” सिनेमाच्या त्या दृश्यासाठी हे करणं गरजेचं असल्याने तिने त्याचं म्हणणं ऐकलं. मात्र सिनेमा पाहिल्यानंतर ते दृश्य पाहून शेरॉनने दिग्दर्शकाला कानाखाली लगावली.

या आधी शेरॉनने तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर तिच्यात अजोबांनी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा केला होता. शेरॉनच्या या पुस्तकामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 11:59 am

Web Title: hollywood actress sharon stone reveals doctor increased breast size without consent kpw 89
टॅग : Entertainment News
Next Stories
1 ‘या’ दिवशी करीना सांगणार तैमूरच्या धाकट्या भावाचं नाव?
2 गर्भपातामुळे पत्नी घेत होती गोळ्या; अटकेनंतर एजाज खानचा खुलासा
3 माधुरीच्या ‘डान्स दीवाने’ सेटवर करोनाचा उद्रेक, १८ जण पॉझिटीव्ह
Just Now!
X