हॉलिवूड सिनेसृष्टीतील फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींवर अमेरिकन विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेतील हा आजवरचा सर्वात मोठा शैक्षणिक घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय, जॉर्ज टाउन विश्वविद्यालय, कॅलिफोर्निया विश्वविद्यालय यांसारख्या मान्यवर विद्यापिठांमध्ये प्रवेश घेऊन उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न जगभारातील विद्यार्थी पाहात असतात. या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एसएटी किंवा एसीटी या प्रकारच्या प्रवेश परिक्षा द्यावा लागतात. परंतु या परिक्षेची प्रवेश प्रक्रिया कठीण असल्यामुळे फार कमी विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण होतात. परिणामी, कोट्यावधी विद्यार्थांपैकी काही मोजक्याच विद्यार्थांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी या विद्यापिठांमध्ये मिळते. अशा वेळी नापास होणारे विद्यार्थी प्रवेश मिळवण्यासाठी काही पर्यायी मार्ग शोधू लागतात. वाट्टेल तितके पैसे देऊन प्रवेश मिळवण्याची तयारी या विद्यार्थ्यांची असते. अशा विद्यार्थांकडून पैसे घेऊन त्यांना प्रवेश मिळवून देण्याचे काम फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन या दोन अभिनेत्री करत होत्या.

श्रीमंत मुलांकडून लाखो रुपये घेउन त्यांना अमेरिकेतील मान्यवर विद्यापिठांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा गुन्हा या दोन अभिनेत्रींनी केला आहे. या दोघींव्यतिरिक्त अन्य ५० जणांवर या प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. विद्यापिठांच्या प्रवेश प्रक्रियेत सातत्याने घोटाळे होत असल्याची माहिती एफबीआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफबीआयच्या टीमने या घटनेसंदर्भात आपल्या तपास सुरु केला.  या तपासाला त्यांनी ऑपरेशन वार्सिटी ब्लू असे नाव दिले. या तपासादरम्यान त्यांनी काही विद्यार्थांची चौकशी केली त्यावेळी फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन ही दोन नावे त्यांच्या समोर आली. मात्र या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.