23 November 2017

News Flash

Insidious 4 Trailer: हा ट्रेलर पाहून तुम्हालाही भीती वाटेल!

स्वतःचे घर वाचवण्यासाठी दिलेला लढा या चित्रपटातून पाहता येणार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 11:27 AM

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनाबेल’ आणि ‘इट’ या भयपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील या दोन्ही सिनेमांच्या कमाईचा आकडा पाहिला तर भयपट पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही हे मान्य करावेच लागेल. या दोन चित्रपटांनंतर आणखी एक भयपट येतोय. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो पाहिला तर तुम्हालाही भीती वाटेल.

जेम्न वॅन निर्मित ‘इनसिडियसः द लास्ट की’ या भयपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अॅडम रॉबिटल दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळातच व्हायरल झाला. हा ट्रेलर पाहताना तुम्हाला नक्कीच भीती वाटेल. या चित्रपटात लिन शाय ही डॉ. अॅलिस रेनियरची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. ती स्वतः पॅरासायकोलॉजिस्ट असते. आतापर्यंत दुसऱ्यांसाठी वाईट शक्तींशी लढणाऱ्या अॅलिसने स्वतःचे घर वाचवण्यासाठी दिलेला लढा या चित्रपटातून पाहता येणार आहे. पुढील वर्षी ५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जेम्स वॅन यांनी याआधी कॉन्युरिंग आणि इनसिडियस या दोन्ही सिनेमांचे दोन भाग दिग्दर्शित केले आहेत.

दरम्यान, हॉलिवूडचा भयपट ‘इट’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या कलेक्शनचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. या सिनेमाने अमेरिकेत अवघ्या तीन दिवसांत सुमारे ११.७२ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व भयपटांचा रेकॉर्ड या सिनेमाने मोडला आहे. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भयपटांमध्ये ‘इट’ हा अव्वल ठरला आहे. आता ‘इट’ सिनेमाचा रेकॉर्ड ‘इनसिडियसः द लास्ट की’ मोडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

First Published on September 14, 2017 11:27 am

Web Title: hollywood horror movie insidious the last key trailer released