01 March 2021

News Flash

Video : ‘इन द मॉर्निंग’ म्हणत जेनिफर लोपेझने केलं न्यूड व्हिडीओशूट

जेनिफर लोपेझच्या न्यूड व्हिडीओशूटची सोशल मीडियावर चर्चा

सध्याच्या काळात न्यूड फोटोशूट करणं हे अभिनेत्रींसाठी नवीन राहिलेलं नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. यात आता मराठी अभिनेत्रीदेखील पुढे सरसावत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यात अभिनेत्री, गायिका जेनिफर लोपेझने एक न्यूड व्हिडीओशूट केलं असून त्यातील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

५१ वर्षीय जेनिफरचे आजही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यामध्येच तिने आता एक न्यूड फोटोशूट केलं आहे. ‘इन द मॉर्निंग’ या नव्या व्हिडीओसाठी तिने खास हे व्हिडीओशूट केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Lopez (@jlo)


“मी तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करते.. एकतर्फी प्रेमाची ही एक बाजू आहे. यातून हेच दिसतंय की तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त स्वत:मध्ये बदल घडवू शकता. त्यामुळे तुमच्यातील पंखांना बळ द्या आणि त्या गोष्टींपासून दूर व्हा ज्यांना तुमची कदर नाही”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

वाचा: Photo : जेनिफर लोपेझच्या ‘त्या’ ड्रेसमुळे गुगलवर झाला ‘फोटो फिचर’चा जन्म

दरम्यान, जेनिफरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५१ व्या वर्षीदेखील जेनिफर फिटनेसच्या बाबतीत अनेकांवर मात करताना दिसते. उत्तम गायिका असण्यासोबतच ती एक अभिनेत्रीदेखील आहे. हसलर्स या चित्रपटात ती अखेरची झळकली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 3:10 pm

Web Title: hollywood jennifer lopez nude for in the morning new song video goes viral ssj 93
Next Stories
1 निपुण धर्माधिकारीच्या घरी चिमुकलीचं आगमन
2 प्रतीक्षा संपली! शाहिदचा ‘जर्सी’ प्रदर्शनासाठी सज्ज
3 काय चालवलं काय आहे तुम्ही?; फोटो ग्राफर्सला पाहताच जया बच्चन संतापल्या
Just Now!
X