News Flash

उपकारांची परतफेड म्हणून या अभिनेत्याने आपल्या मित्रांना दिले ६ कोटी रुपये

पैशांनी भरलेली ती बॅग पाहिली तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्य वाटले

जॉर्ज क्लूनी हे हॉलिवूडमधील एक मोठं प्रस्थ आहे. जर तुम्ही जॉर्ज क्लूनीचे मित्र आहात तर तुम्हाला कदाचित ६ कोटी रुपये मिळू शकतात. क्लूनी यांनी आपल्या जवळच्या १४ मित्रांना प्रत्येकी १० लाख डॉलर म्हणजे साधारणपणे ६.४३ कोटी रुपये दिले आहेत. तसेच त्याने भेट म्हणून दिलेल्या रक्कमेवरील करही स्वत:च भरला.

जॉर्जचा जवळचा मित्र रँडे गार्बरने २०१३ मध्ये एका मुलाखतीत म्हटले की, क्लूनीने काही मित्रांना घरी बोलावले. सर्व घरी जमल्यावर त्यांना टेबलवर डिझायनर बॅग दिसल्या. या प्रत्येक बॅगमध्ये १० लाख डॉलर होते. यानंतर जॉर्ज म्हणाला की, ‘मित्रांनो माझ्या आयुष्यात तुमचे काय स्थान आहे हे मला तुम्हाला दाखवायचे आहे. जेव्हा मी लॉस अँजेलिसला आलो होतो तेव्हा तुम्ही मला खूप मदत केली. आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे. तुमच्याशिवाय मी काहीच नाही. तुम्ही केलेल्या मदतीची मी परतफेड करू शकत नाही, पण तरीही एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला दिलेल्या बॅग उघडा.’

गार्बर म्हणाला की, आम्ही सर्वांनी जेव्हा पैशांनी भरलेली ती बॅग पाहिली तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. जॉर्ज आम्हा साऱ्यांना म्हणाला की, मला माहितीये आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना केलाय. काहीजण आजही त्याच परिस्थितीत आहेत. पण यापुढे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. तुम्हाला कोणाच्या बंधनात राहायची गरज नाही. जॉर्जने दिलेल्या पैशांचा कर त्याच्या मित्रांना भरावा लागू नये म्हणून त्याने कराची रक्कमही अगोदरच भरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:02 pm

Web Title: hollywood star george clooney friends one million dollars
Next Stories
1 TOP 10 NEWS : सायरा बानो यांनी मालमत्तेबाबत केलेल्या खुलाशापासून मीना कुमारींच्या बायोपिकपर्यंत
2 ‘होम मिनिस्टर’ला टक्कर देणार ‘नवरा असावा तर असा’
3 Raakshas Teaser Poster : ‘राक्षस’मध्ये दिसणार सई
Just Now!
X