News Flash

Video : ‘गली बॉय’च्या अभिनयाची छाप विल स्मिथवर

स्मिथने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून तिकीटबारीवर आपलं स्थान कायम केलं आहे. केवळ तीन दिवसात या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची भुरळ हॉलिवूडलाही पडली आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला हा चित्रपट आवडला असून त्याने ‘गली बॉय’चं म्हणजेच रणवीर सिंहचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगणाऱ्या ‘गली बॉय’ या चित्रपटाची समीक्षकांकडूनही प्रशंसा होत आहे. त्यातच स्मिथने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत रणवीर सिंहचं कौतुक केलं आहे. तसंच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

“ओल्ड स्कूल हिप हॉप इथं तसंच जगभर होताना बघून मला खूप आनंद होतोय. तू गलीबॉयमध्ये केलेलं कामही मला प्रचंड आवडलं आहे. तूझं मनापासून अभिनंदन”,असं स्मिथने म्हटलं आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:47 pm

Web Title: hollywood star will smith congratulates ranveer singh work for gully boy
Next Stories
1 शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमनं जमवला ५० लाखांचा निधी
2 एकल पालकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांना करणचं सडेतोड उत्तर
3 …म्हणून कार्तिकनं नाकारली १० कोटींची ऑफर
Just Now!
X